डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

जिल्हा परिषदेच्या आदेशामुळे हाफडे थांबला |zp school latest update|

 दि.16 मार्च 2024 पासून शाळा पुढील आदेशापर्यंत पूर्ण वेळ चालू ठेवणे बाबत.


वरील विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, सध्या वातावरणात पाहिजे तसा बदल झालेला नसल्याने दि. 16 मार्च 2024 पासून शाळेची वेळ अर्धवेळ न करता पुढील आदेशापर्यंत पूर्ण वेळ ठेवण्यात येत आहे. शाळेच्या वेळेत आपल्या स्तरावरुन कोणताही बदल करण्यात येवू नये.


तसेच परस्पर शाळेच्या वेळेत बदल केल्याचे आढळून आल्यास संबंधित मुख्याध्यापक / केंद्रप्रमूख यांच्यावर कार्यवाहीचा प्रस्ताव या कार्यालयास तात्काळ सादर करण्यात यावा. याची नोंद घेण्यात यावी असे आदेशात म्हटलेले आहे.




महागाई भत्तांमध्ये चार टक्के वाढ/da hike/4%da/

 महागाई भत्तांमध्ये चार टक्के वाढ करणेबाबत राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 13 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे 

भारत सरकारच्या वित्त मंत्रालय विभागाच्या क्रमांक 01/01/2024 E-II ( B) दिनांक 12 मार्च 2024 च्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत ही महाराष्ट्र राज्य संवर्गातील आखिल भारतीय सेवा मधील अधिकाऱ्या संदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाही करीता अग्रेषित करण्यात आलेली आहे .

सदर केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या नमुद ज्ञापनानुसार दिनांक 01 जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आलेल्या 4 टक्के वाढीव दराने महागाई भत्ता व ज्ञापनांमध्ये नमुद करण्यात आलेल्या इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील आखिल भारतीय सेवामधील अधिकाऱ्यांना लागू असणार आहेत , व त्यानुसार दिनांक 01 जानेवारी 2024 पासून 50 टक्के दराने महागाई भत्ता अनुज्ञेय असणार आहेत .

या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागांकडून निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..




शिक्षकांना ड्रेस कोड लागू /teacher dress code/

 राज्यातील सर्व शिक्षक संवर्गासाठी पेहरावासंदर्भात मागदर्शक सूचना निर्गमित करणे व शिक्षकांच्या संबोधनाबाबत.

शासन परिपत्रक:-

दिनांक: १५ मार्च, २०२४.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी, अल्पसंख्याक, इत्यादी सर्व व्यवस्थापना अंतर्गत अनुदानित/अंशतः अनुदानित/विनाअनुदानित/स्वयंअर्थसहाय्यित तसेच अल्पसंख्यांक व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या व सर्व बोर्डाच्या शाळांतील कार्यरत शिक्षक हे भावी पिढी घडवीत असतात. तसेच, जनमानसात त्यांचेकडे गुरु/मार्गदर्शक म्हणून पाहिले जाते. या शिक्षकांचा संबंध हा विद्यार्थी, पालक, गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती व लोकप्रतिनिधी यांचेशी येत असतो. तसेच त्यांचे सोबत संवाद होत असतो. अशा वेळी त्यांची वेशभूषा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अत्यंत महत्वाचा भाग म्हणून पाहिला जातो. संबंधितांच्या वेशभूषेवरुनच ते कार्यरत असलेल्या पदाची एक विशिष्ट छाप पडत असते. त्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करीत असताना वेशभूषेबद्दल जागरुक राहून आपली वेशभूषा ही आपल्या शाळेस व पदास किमान अनुरुप ठरेल, याची सर्वतोपरी काळजी घेणे अभिप्रेत आहे. सामान्यतः विद्यार्थी हे अनुकरणप्रिय असतात. त्यामुळे जर शिक्षकीय पदाची वेशभूषा ही अशोभनीय, अव्यवस्थित किंवा अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या एकंदरीत व्यक्तीमत्वावर तसेच, त्यांचेसमोर अध्ययन करणाऱ्या विद्यार्थी यांचेवर होत असतो. ही बाब विचारात घेता, राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनांच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांकरीता दैनंदिन पेहराव कशा पध्दतीचा असावा याबाबत पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत :-

) सर्व १ शिक्षकांचा दैनंदिन पेहराव हा शिक्षकीय पदास अनुसरुन असावा.

२) सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा, जसे महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार/चुडीदार, कुर्ता, दुपट्टा अशा पध्दतीने पेहराव करावा. तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राऊझर पॅन्ट, शर्ट इन करुन परिधान केलेला असावा. गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम/चित्रे असलेले पेहराव परिधान करु नयेत. तसेच शिक्षकांनी जीन्स व टी-शर्ट चा वापर शाळेमध्ये करु नये.

३) परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा, याची दक्षता सर्व शिक्षकांनी घ्यावी.

शासन आदेश पहा....

१) सर्व शिक्षकांचा दैनंदिन पेहराव हा शिक्षकीय पदास अनुसरुन असावा.
२) सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा, जसे महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार/चुडीदार, कुर्ता, दुपट्टा अशा पध्दतीने पेहराव करावा. तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राऊझर पॅन्ट, शर्ट इन करुन परिधान केलेला असावा. गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम/चित्रे असलेले पेहराव परिधान करु नयेत. तसेच शिक्षकांनी जीन्स व टी-शर्ट चा वापर शाळेमध्ये करु नये.

३) परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा, याची दक्षता सर्व शिक्षकांनी घ्यावी.