ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन शिक्षण कर्ज व्याज परतावा योजना
ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी तसेच शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षण कर्जावरील व्याज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ "शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना" सुरू होणार आहे.
ज्याचा फायदा ४०० विद्यार्थ्यांना होणार
असून यासाठी जवळपास ६ कोटीचा निधी तरतुद करण्यात आला आहे. याबाबत माहिती इ.मा.बहूजन कल्याण मंत्री श्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
या योजनेचा फायदा विद्यार्थ्यांना राज्य अंतर्गत , देशातील तथा आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम यावरील शिक्षण करीता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना होणार आहे.
या योजनेची राज्य व देश अंतर्गत शिक्षण घेण्याची कर्ज मर्यादा ही महत्त्तम १० लाख तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम शिक्षण कर्ज मर्यादा २० लाख इतकी असणार आहे.
या योजनेत बॕकेचा जास्तीत जास्त १२ % व्याज परतावा नियमित कर्जफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना होणार आहे.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.