डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

पॕनकार्ड वापरतात मग हे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे #pancard,

 ज्याप्रमाणे आधार ही तुमची वैयक्तिक ओळख दर्शवते त्याचप्रमाणे  पॕनकार्ड हे तुमची आर्थिक व्यवहारातील खरी ओळख दर्शवते. आर्थिक व्यवहारांकरिता सध्या पॅनकार्ड अनिवार्य आहेच. पॅनकार्डचा वापर दैनंदिन आर्थिक बाबतीत  अधिकृत ओळखपत्रच म्हणून केला जातो. 



जर तुम्ही एखाद्या कंपनीत किंवा सरकारी  ठिकाणी काम करत असाल तर पगारासाठी तुमच्याकडे पॅनकार्ड असणे आवश्यक आहे.

जन्मतारखेचा बरोबर खाली असलेल्या पॅन क्रमांकाची सुरुवात इंग्रजी आकड्यांनी होते. आयकर विभागाच्या माहितीनुसार, कोणत्याही पॅन क्रमांकाची सुरुवात इंग्रजी अल्फाबेटने झालेली असते, त्यात AAA पासून ZZZ पर्यंत कोणत्याही तीन अक्षरांचा समावेश असतो.

 अक्षरे कोणती असतील याचा निर्णय आयकर विभाग घेत असतो.पॅनचे चौथे अक्षर हे आयकर विभागाच्या अधिकऱ्यांकडून नक्की केले जाते. जर पॅनकार्डच्या चौथ्या स्थानी P असेल तर संबंधित पॅनकार्ड हे खासगी असून एखाद्या व्यक्तीच्या नावे त्या पॅनकार्डची नोंदणी झाली आहे. 

त्याचप्रमाणे जर चौथ्या स्थानी जर 

  • G-  ने गव्हर्नमेंट असे दर्शवल्या जाते.
  •  F - असेल तर संबंधित पॅनकार्ड हे संस्थेच्या नावे नोंदणीकृत आहे.
  • AOP - म्हणजे असोसिएशन ऑफ पर्सन, 
  •  C - द्वारे कंपनी, 
  • T - द्वारे ट्रस्ट, 
  • H - म्हणजे अविभाजित हिंदू परिवार, 
  • B - म्हणजे बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल, 
  • L - ने लोकल, 
  • J - ने आर्टिफिशियल ज्युडिशियल पर्सन, 


पॅनकार्डवरील पाचवे अक्षर हे व्यक्तीचे आडनाव दर्शवते, जर एखाद्या व्यक्तीचे नाव कदम असेल तर पाचव्या स्थानी K लिहिलेला असतो. आडनावानंतर चार आकडे असतात. यात ००००१ ते ९९९९ पर्यंत कोणतेही चार आकडे असतात. हे आकडे कोणते असतील याचा निर्णय आयकर विभाग ठरवते. पॅनकार्डच्या दहाव्या स्थानी A ते Z मधील शब्द असतो.


       अशा प्रकारे तुमच्या पॕनकार्ड क्रमांक हा बनलेला असतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: