डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

खिन्न प्रवास भावनांचा.... नविन काव्यरचना... #Poem

 *खिन्न प्रवास भावनांचा*






खिन्न प्रवास भावनांचा....


विनी वेळ दुःख जणू जीवनास,

आता होत खिन्न प्रवास भावनांचा,

सामर्थ्य  हे उरत काट तरण्यास,

जागवी ध्यास मनास या साधनांचा



प्रफुल्लित होते ते ही काही क्षण 

उत्साही होते हे किती माझे मन,

नैराश्याशी होतो  जीवनी हा समर,

विचार आता तेथेच  गोते खात अन्



फिरलो जरा ध्येयापासुन अलगद 

वेचत होतो विजयाची सुमने अनंत,

तोल या जगण्याचा डगमगला जरी,

तग धरण्या ध्येर्य बांधले चिरंत,



हुरुप सदासर्वदा कसाच जागतो,

न मानुनी हार लढण्या जगतो,

सांभाळून बाजू असली जरी उणी,

स्वतःस लढाऊ बनवून तारतो....


       कवी

🖊️प्रकाशसिंग राजपूत🖊️

            औरंगाबाद  


माझे काव्यरंग पुस्तक Flipkart /Amazon  वर उपलब्ध ....नक्कीच खरेदी करा

Buy now


गीत अलंकारवर माझ्या रचना ऐकण्यास उपलब्ध चॕनलला सबस्क्राईब अवश्य करा...


युटूब चॕनल पहा.....



अशाच नवनविन काव्य रचना आपणांस उपलब्ध राहण्यासाठी लवकरच गीत अलंकार वेबसाईट उपलब्ध करून देत आहोत.... 




2 Comments:

Raju Athawale म्हणाले...

विनी वेळ म्हणजे काय?

Digital group म्हणाले...

विणी असा प्रयोग करायचा होता जो विनी असा झाला ,विणने या शब्दाचा असा शब्दप्रयोग केला आहे , विणून हे ही करता येईल.