महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra education board) परीक्षा बाबत....
इयत्ता दहावीची परीक्षा मंगळवार 15 मार्च 2022 तर इयत्ता बारावीची परीक्षा शुक्रवार 4 मार्च 2022 पासून सुरू होणार आहे.
याबाबतचे मंडळाच्या संकेतस्थळावर हे वेळापत्रक जारी करण्यात आले असून तेच वेळापत्रक विद्यार्थी, शाळा, पालक यांनी प्रमाण मानावे, आणि सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही वेळापत्रक आणि माहितीवर विश्वास ठेवू असे आवाहन मंडळाने पालक व परीक्षार्थींना केले आहे.
दहावी बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक हे राज्य शिक्षण मंडळाच्या खालील
संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले असून परीक्षेपूर्वी शाळांकडे देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असणार आहे.
त्या वेळापत्रकावरून खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असेही शिक्षण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार 80 गुणाच्या पेपरला 30 मिनिटे आणि 40 गुणाच्या पेपरला 15 मिनिटे अधिक वेळ मिळणार आहेत.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा