चांगल्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन खूप महत्त्वाचं आहे. टॅक्स वाचवून तुम्ही तुमच्या बचतीमध्ये वाढ करू शकता.
टॅक्स वाचवायचा याचा अर्थ टॅक्स चोरी करायची असा होत नाही. सध्या अशा काही सरकारी योजना उपलब्ध आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही टॅक्स वाचवू शकता.
या योजना कोणत्या आहेत आपण जाणून घेऊया.
१) सुकन्या समृद्धी योजना (SSY)- देशातील लहान मुलींसाठी मोदी सरकारनं सुरू केलेली ही एक छोटी बचत योजना आहे. सुकन्या समृद्धी योजनेत Sukanya Samriddhi Yojana तुम्ही तुमच्या 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावानं खातं उघडून टॅक्स वाचवू शकता. या योजनेत वर्षाकाठी जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करून आयकर सूट मिळू शकते. या योजनेवर सरकार सध्या 7.6 टक्के वार्षिक व्याज देत आहे.
२) नॅशनल पेन्शन स्कीम (NPS)- एनपीएस National Pension System ही एक सरकारी सेवानिवृत्ती बचत योजना आहे. आयकर कायद्यातील कलम 80सी नुसार, 1.5 लाख रुपयांशिवाय आणि 50 हजार रुपये व्याजावरील करामध्ये सवलत मिळवता येते. त्यासाठी फक्त तुम्हाला एनपीएसमध्ये गुंतवणूक करावी लागेल. असं केल्यास तुम्ही एकूण 2 लाख रुपयांच्या मिळकतीवर कर सवलत मिळवू शकता.18 ते 65 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत खातं उघडून महिन्यालाb एक हजार रुपयांची गुंतवणूक करू शकतो.
३) पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF)- इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी पीपीएफ योजना ही सर्वोत्तम सरकारी योजना मानली जाते.
तुम्ही पीपीएफमध्ये वर्षाकाठी 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. सरकार पीपीएफमध्ये गुंतवणुकीची हमी देतं. म्हणजेच या योजनेत तुमचे पैसे एकदम सुरक्षित आहेत. सध्या सरकार पीपीएफवर 7.10 टक्के वार्षिक व्याज देत आहे. या योजनेमध्ये आयकर कायद्यातील कलम 80 सी नुसार तुमच्या गुंतवणुकीवरील करात सूट मिळते.
४) ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)- एससीएसएस (Senior Citizen Saving Scheme) ही ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असलेली चांगली बचत योजना आहे.
कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्टात यासाठी खातं उघडता येतं. या खात्यामध्ये जमा असलेल्या रकमेवर आयकर कायद्यातील कलम 80 सी अंतर्गत कर सवलत मिळते. या योजनेत तुम्ही वर्षाकाठी 1.5 लाख रुपये गुंतवणूक करू शकता. सध्या यासाठी 7.4 टक्के व्याज मिळत आहे.

५)जीवन विमा (Life Insurance)- युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (ULIPs) मधील गुंतवणुकीवरसुद्धा कर बचत (Tax Saving) सवलत उपलब्ध आहे.
या गुंतवणुकीच्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त 2.5 लाख रकमेवर सूट मिळवू शकता. त्यापेक्षा जास्त किंमतीच्या प्रीमियमवर (Premium) कोणतीही सूट मिळणार नाही. सध्याच्या आयकर कायद्यातील कलम 10 (10D) नुसार जीवन विमा पॉलिसीची म्यॅच्युरिटी करमुक्त आहे. युएलआयपीमध्ये पाच वर्षांच्या लॉक-इन कालावधीसाठी विमा आणि गुंतवणूक करता येते.
टॅक्स सेव्हिंग फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करून तुम्ही इन्कम टॅक्स वाचवू शकता. टॅक्स सेव्हिंग एफडीमधील गुंतवणूक पाच वर्षांसाठी लॉक केली जाते. टॅक्स सेव्हिंग एफडीचे व्याज दर वेळोवेळी बदलतात.
या एफडीमधील गुंतवणूक एकदम सुरक्षित आणि रिटर्नची हमी देणारी आहे. या योजनेमध्ये वर्षाला 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर कर सवलत मिळवता येते.

६) इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELSS)- ईएलएसएस Equity Linked Savings Schemeहा एक इक्विटी फंड आहे. हा असा एकमेव म्युचुअल फंड आहे ज्यामध्ये दीड लाख रुपयांपर्यंतची कर सवलत मिळते.
ईलएसएसमध्ये वार्षिक एक लाख रुपयांपर्यंतच्या रिर्टन किंवा नफ्यावर कर लागत नाही. या योजनेमध्ये कमीत कमी 3 वर्षांच्या लॉक-इन कालावधीत गुंतवणूक करण्याची सुविधा आहे. टॅक्स वाचवण्याचा हा एक चांगला पर्याय आहे. वरील सरकारी बचत योजनांचा वापर करून तुम्ही टॅक्समध्ये सूट मिळवू शकता. टॅक्समध्ये सूट मिळाल्यानं आर्थिक बचत होण्यास मदत होते.

0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा