डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

डी.एड शासकीय महाविद्यालय बंद होणार Ded college closed

 राज्यात एकूण 12 शासकीय अध्यापक महाविद्यालय कार्यरत होती. मात्र, यापैकी पाच महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या प्रवेशाअभावी बंद करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षात विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात नोकरी मिळण्याची शक्यता कमी झाल्याने विद्यार्थ्यांचा अध्यापक महाविद्यालयांकडे ओढा नसल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. 



ही महाविद्यालये होणार बंद ? 

 विद्यार्थी संख्येअभावी राज्यातील रायगड जिल्ह्यातील सासवणे शासकीय अध्यापक विद्यालय, 

  • माणगाव शासकीय अध्यापक विद्यालय,
  •  बीड जिल्ह्यातील नेकनूर शासकीय अध्यापक विद्यालय,
  •  अमरावती जिल्ह्यातील अमरावती शासकीय अध्यापक विद्यालय 
  • आणि पुणे जिल्ह्यातील उर्दू शासकीय अध्यापक विद्यालय


 बंद करण्याचा निर्णय शिक्षण उपसंचालकांनी घेतला आहे. ही महाविद्यालये बंद करण्यात येत असल्याबाबत राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही दुजोरा दिला.

का झाली महाविद्यालय बंद ? 

राज्यात अध्यापक महाविद्यालय म्हणजे डीएड महाविद्यालयांची संख्या एक हजार शंभर इतकी होती. मात्र, गेल्या काही वर्षात शिक्षकांची नोकरभरती झालेली नाही. त्यामुळे नोकरी मिळणार नाही, या कारणास्तव शिक्षकी पेशाकडे वळण्यास अथवा अध्यापक विद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यास विद्यार्थी उत्सुक नाहीत.



 यामुळे राज्यातील महाविद्यालयांची संख्या 2019-20 मध्ये 894 वर पोहोचली तर आता ती आणखी कमी होऊन 654 पर्यंत घसरली आहे. गेल्या काही वर्षांपासून शासनाने खासगी अध्यापक विद्यालयाचे वेतनेतर अनुदान बंद केले आहे. त्यामुळे केवळ अनुदानासाठी महाविद्यालय चालवली जात नाहीत, तर प्रयत्न करून आणि मोफत प्रवेश देऊनही विद्यार्थी येत नसल्याने संस्थाचालक हवालदिल झाले आहेत.