डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

आरटीई प्रवेश यंदा अनेक जागा रिक्त

 खाजगी इंग्रजी शाळेच्या आरटीई अंतर्गत  शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांचे मोफत प्रवेश केले जातात. 

यावर्षीच्या प्रवेश प्रक्रियेत यंदा ९ हजार ८६ शाळांतील १ लाख १ हजार ९०६ जागांसाठी २ लाख ८२ हजार ७८३ विद्यार्थ्यांनी अर्ज केला. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने काढलेल्या सोडतीत ९० हजार ६८५ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. शुक्रवारी सायंकाळपर्यंत जवळपास ५४ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्याची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली. 

आरटीई अंतर्गत सुरू असलेली प्रवेश प्रक्रिया आतापर्यंत मंदगतीने सुरू आहे.


जागा रिक्त राहील्या असे का झाले?


 आरटीई प्रवेश प्रक्रियेत आवश्यक कागदपत्रे पालकांकडे उपलब्ध नसल्याने किंवा ती उपलब्ध होण्यास वेळ लागत असल्याने अनेक पालकांना प्रवेश निश्चित करण्यात अडचणी येत आहेत. 

प्रवेशासाठी देण्यात आलेल्या मुदतवाढीचा कालावधी संपत येऊनही प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांपैकी जवळपास ३५ हजार विद्यार्थ्यांचा अद्याप प्रवेश निश्चित नाही.

मुदतवाढ परत मिळणार ?

आता प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून प्रवेशांसाठी पुन्हा मुदतवाढ दिली जाणार, की प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.