RTE प्रवेश बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत ऑनलाइन राबवण्यात येणाऱ्या 25 टक्के प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षा यादीतील प्रवेशाला 3 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत निवड यादीतील बालकांचे प्रवेश प्रक्रियेची मुदत 10 मे 2022 रोजी पर्यंत होती. निवड झालेल्या 90 हजार 685 विद्यार्थ्यांपैकी 62 हजार 155 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. याआधी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.
शालेय शिक्षणाचे हायब्रीड माॕडेल विकसित व्हावे... नरेंद्र मोदी
त्यामुळे प्रतीक्षा यादीसाठी 39 हजार 751 जागा शिल्लक राहिल्या होत्या. त्यानंतर 19 ते 27 मेपर्यंत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला सुरुवात झाली. यावेळी प्रतीक्षा यादीतील 7 हजार 576 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. मात्र अनेक पालकांना प्रवेश घेण्यासाठी शाळांमध्ये जाण्यात अडचणी येत असल्याने प्रतीक्षा यादीतील पहिल्या फेरीतील बालकांच्या प्रवेशासाठी 3 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण संचालनालयाचे संचालक यांनी घेतलेला आहे.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा