राज्य शासकीय व अन्य कर्मचा-यांप्रमाणे तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा यांना लागू करण्याची शिफारस शासनास करण्याबाबत.
संदर्भ:-
१. आयुक्त शिक्षण कार्यालयाकडील पत्र क्र. अंदाज-२०१/ सुसेआप्रया/ २०२२/२२१६ दिनांक १३.०४.२०२२
२. आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखालील दिनांक २७.०४.२०२२ राजीच्या बैठकीतील निर्देश,
शासन निर्णय दिनांक ३१.०७.२०१९ अन्वये राज्य शासकीय व अन्य कर्मचाऱ्यांना याप्रमाणे तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षकांना लागू करणे व शिक्षकांच्या वेतनश्रेणीशी संबंधित इतर बाबींच्या अनुषंगाने शिफारस करण्याकरीता मा. आयुक्त (शिक्षण) याच्या अध्यक्षतखाली अभ्यास गटाची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
अभ्यास गटाचा अहवाल शासनास दिनांक ०६.०५.२०२० रोजी सादर केलेनंतर शासन पत्र दिनांक २३.११.२०२१ नुसार सदर अहवालामध्ये अनुक्रमे १ ते ६ त्रुटी असलेबाबत कळविण्यात आलेले होते.
त्यानुषंगाने मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांचे कडून शासन पत्रात नमूद असलेल्या ६ मुद्द्यांपैकी अनुक्रमे १ ते ४ मुद्द्यांचा पूर्तता प्रस्ताव बैठकीत सादर करण्यात आलेला होता.
मुद्दा क्र. ५ व ६ बाबतची सविस्तर माहिती शिक्षण संचालक, प्राथमिक व शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांना दिनांक २७.०४.२०२२ रोजीच्या बैठकीत सादर करणेबाबत संदर्भ क्र. १ नुसार कळविण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही सदर मुद्यांबाबतची सविस्तर माहिती अप्राप्त आहे. तरी सदरील माहिती तात्काळ सादर करणेबाबत विनंती करण्यात आलेली आहे.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.