बिलोली तालुक्यातील कोल्हेबोरगाव येथील एका शाळेतील तब्बल 15हून अधिक विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराच्या खिचडीत पाल आढळल्याने विषबाधा झाल्याची घटना समोर आलेली आहे.
ही बाब समजेपर्यंत बहुतांश विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ली होती. ज्याच्या ताटात पाल आढळली, तो सातव्या वर्गातील पृथ्वीराज वाघमारे यास उलट्या, चक्कर आणि मळमळीचा त्रास जाणवू लागल्याने पालकांनी त्यास लोहगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तद्नंतर एकामागून एक विद्यार्थी येत गेल्याने संख्या 15 च्या वर गेली.
कोल्हेबोरगाव येथील पंधरा ते वीस विद्यार्थ्यांना मळमळ होणे, उलट्या होणे व चक्कर येण्याचा त्रास होत असल्याने सदरील विद्यार्थ्यांना रुग्णालयात आणण्यात आले होते. या विद्यार्थ्यांवर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले. दोन विद्यार्थ्यांना जास्तीचा त्रास असल्याने त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.