डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

सेतूच्या पूर्व चाचणी कालावधी वाढविला

 सेतूच्या पूर्वचाचणी आता पुढे ढकलल्या....


करोना काळातील दोन वर्षांच्या काळात विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाकडून ३० दिवसांचा सेतू अभ्यासक्रम दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यासाठी राबविणे बंधनकारक केलेले आहे. 

आता या अभ्यासक्रमासाठी चाचणी घेण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. दि. १७ आणि १८ जून रोजी घेण्यात येणारी पूर्व चाचणी घेण्यासाठी आता एससीईआरटीकडून २० जून ते २५ जूनपर्यंतची मुदत वाढवून दिली आहे. 


सेतु अभ्यासक्रम व चाचणीची गरज का?

विद्यार्थ्यांना ऑनलाईन व काही काळ ऑफलाईन अभ्यासाच्या मागील वर्षाच्या शैक्षणिक कालावधीत अध्यापनाचे आकलन किती व कसे झाले आहे, याची नोंद पूर्व चाचण्यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

सेतू पुर्वचाचणी पेपर डाऊनलोड  करा...

 पूर्व चाचण्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे नमुनाधारित सर्वेक्षण घेऊन माहितीचे विश्लेषण करून, त्याचे निष्कर्ष प्रसिद्ध केले जाणार असल्याची माहिती एससीईआरटीकडून देण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: