बदल्या संदर्भात अनेक बाबतीत संभ्रम निर्माण झालेले असून यावर श्री संतोष ताठेसर यांचे संघटनात्मक नेतृत्व दृष्टीने मांडलेले हे विचार आहेत.
📣📣📣📣📣📣📣📣
*बदली अपडेट*
📣📣📣📣📣📣📣📣
*शिक्षक बदल्या होतील का ?*
🧐😇🤔
*शिक्षक संवर्ग सर्वसाधारण बदल्या २०२२*
*सर्वांना सस्नेह नमस्कार*🙏🏻🙏🏻
शिक्षक संवर्ग सर्वसाधारण बदली प्रक्रियेबाबत एक बातमी सध्या सगळीकडे स्प्रेड होताना दिसतेय की ...*राज्यसरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना नोव्हेंबरपर्यंत स्थगिती...*
यावरून बऱ्याच बांधवांनी मला वैयक्तिक फोन करून विचारले की आपल्या बदल्या होतील की नाही ?
तर मी वैयक्तिक बाबतीत *९० %* पॉझिटिव्ह आहे की आपल्या बदल्या होणारच ! उर्वरित *१०% भाग* म्हणजे *५ %भाग * शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे आणि *५ %भाग* राजकीय मानसिकता यांवर अवलंबून आहे !
आपण आता थोड्या नकारात्मक बाबी बघू ... त्यानंतर बदल्या होण्याची शक्यता पडताळून बघू .
नवनवीन शैक्षणिक अपडेट मिळविण्यासाठी डिजिटल youtube चॕनलला सबस्क्राईब करा...👇
*बदल्या का होणार नाहीत ?*
१} *शैक्षणिक नुकसान -* आर.टी.ई २००९ नूसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यांसाठी शिक्षक बदल्या या शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी म्हणजे ३१ मे पूर्वी पूर्ण प्रक्रिया राबविण्यात यावी .
२} *नवीन मंत्रिमंडळाचा निर्णय -* नवीन मंत्रिमंडळाला जर हा धोरणात्मक वाटला नाही तर किंवा नवीन ग्रामविकासमंत्री यांना यांत काही तृटी वाटल्यास अडचणी येऊ शकतात .
३} *सॉफ्टवेअर* विन्सिट कंपनीचे सॉफ्टवेअर जर शासनाला अयोग्य वाटले किंवा त्यांच्या व्यवहारात जर कमी- जास्तपणा झाला किंवा उर्वरित रक्कम टप्पा देणे घेणे यांत काही अडचण आली तर ...याचा परिणाम होऊ शकतो .
मुख्यालय संदर्भात मोठी बातमी वाचा...
*बदल्या का होतील?*
*१} मार्च २०२२ पासून सुरू झालेली ही प्रक्रिया निरंतर संथ गतीने का होईना सुरू आहे .*
*२} मंत्रालयीन पातळीवर जी.आर - परिपत्रके काढणे,बदली समिती नेमणूक , परवानग्या घेणे, सॉफ्टवेअर निर्मिती - खरेदी - टेस्टिंग सर्व बाबी पूर्ण झालेल्या आहेत.*
*३} मंत्रालयीन पातळीवरील कामकाज पूर्ण झालेले असून फक्त प्रशासकिय कामकाज शिल्लक आहे ते व्यवस्थितपणे सुरू आहे.*
*४} ओबीसी आरक्षणामुळे ग्रामपंचायत , जि.प निवडणुकावर परिणाम झालेला असून आचारसंहिता आड येणार नाही अपवाद नगरपरिषद निवडणुका आहेत ती बाब आपणांस लागू नाही.*
*५} फेज - १ कामकाज अगदी व्यवस्थित पूर्ण झालेले असून सोशल अपील प्रमाण अगदीच नगण्य आहे.*
*६} आंतरजिल्हा बदली साठी रोस्टर कामकाज बऱ्याच अंशी पूर्ण असून जेथे अडचण तेथे जुनेच रोस्टर वापरायचे अधिकार मा.सी.ई.ओ यांना दिलेले आहेत .*
*७} बदली स्थगितीसाठी परिपत्रक काढतांना मागील शासनाने शिक्षक वगळून काढले होते तेच सध्याच्या शासनाने नोव्हेंबर २०२२ पर्यंत कंटिन्यू केलेले दिसते .*
*८} सध्याच्या सत्ताधारी शासनाने बऱ्याच अडचणींचा सामना केल्याने मागील शासनाने घेतलेले लोकप्रिय निर्णय टाळण्याचा प्रयत्न होणार नाही.*
*९} बदलीसाठी कालावधी वाढवून घेतलेला दिसून येतो.जर बदल्या होऊ द्यायच्या नसत्या तर तात्काळ रद्द झाल्या असत्या .*
*१०} मागील २०१७ मधील बदल्यांचा आढावा घेता त्या जुलै पर्यंत झाल्या होत्या ही बाब सकारात्मक आहे.*
*तरीही बदल्यांसाठी पुढील आठवडा हा निर्णायक असणार आहे.*
*मी फक्त सकारात्मक - नकारात्मक बाबी सांगितल्या आहेत यांसाठी येणारी वेळ हीच बाब महत्त्वाची आहे .*
-
(संकलित)
संतोष ताठे
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा