डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

रणजित डिसले यांच्या अडचणीत वाढ

 जागतिक Global पुरस्कार  विजेते  शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ३४ महिन्यांच्या गैरहजेरीच्या कालावधीत मिळालेले वेतन त्यांनी स्वत:च मंजूर केल्याचे चौकशी अहवालातून उघड झाले आहे.


जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत प्रतिनियुक्तीवर नेमणूक होऊनही डिसले तेथे गेले नाहीत आणि मूळ नियुक्तीच्या ठिकाणी शाळेतही उपस्थित राहिले नाहीत. असे असताना शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा भार बेकायदेशीरपणे स्वत:कडे ठेवून संशयास्पद आर्थिक व्यवहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

जागतिक पुरस्कार मिळवून प्रकाशझोतात आलेले सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी (ता. माढा) येथील प्राथमिक शिक्षक डिसले हे प्रत्यक्षात ३४ महिने शाळेत किंवा प्रतिनियुक्तीवर नेमणूक झालेल्या जिल्हा प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयातही गैरहजर असल्याचे उघड झाले. या प्रकरणी करण्यात आलेल्या चौकशी अहवालात डिसलेंकडून ३४ महिन्यांचे जवळपास १७ लाख रुपये वेतन वसूल करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मात्र, मुळात गैरहजर असताना डिसलेंना वेतन मिळालेच कसे, आणि ते दिले कुणी, असे प्रश्न उपस्थित झाले. डिसले यांनी या कालावधीत मुख्याध्यापक म्हणून गैरहजर असताना स्वत:चे वेतन स्वत:च मंजूर केल्याचे दिसते आहे. चौकशी समितीने नियमबाह्य आर्थिक व्यवहार केल्याचा ठपका डिसले यांच्यावर ठेवला आहे.

शिक्षक बदल्या होतील का?

वेतन मंजूर कसे झाले?

डिसले यांना वेळापूरच्या जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत प्रतिनियुक्तीवर हजर होण्यासाठी नियमानुसार परितेवाडी शाळेतून कार्यमुक्त करण्यात आले होते. त्यानंतर डिसले यांनी शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा संपूर्ण भार तेथील सेवाज्येष्ठ शिक्षक कदम यांना दिला. परंतु आर्थिक व्यवहार डिसले स्वत:च पाहात होते. या कालावधीत त्यांनी नियमबाह्य आर्थिक व्यवहार केल्याचे दिसून येते. मुख्याध्यापक पदाचा भार बेकायदेशीरपणे स्वत:कडे ठेवून डिसले यांनी जिल्हा परिषद प्रशासनाची फसवणूक केली आहे. स्वत:च्या अधिकारात अनधिकृतपणे त्यांनी स्वत:च्या वेतनाची उचल केल्याचे दिसून आले, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

स्वाक्षरीही वेगवेगळी ..

कालावधीत परितेवाडी जिल्हा परिषद शाळा, वेळापूरची जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा परिषदेकडील शालेय अभिलेखे पाहता डिसले यांच्या स्वाक्षरीमध्ये अनेक ठिकाणी फरक असून त्यांनी वेगवेगळय़ा प्रकारची स्वाक्षरी केल्याचे दिसून येते. १३ नोव्हेंबर २०१७ ते ५ मे २०२० या कालावधीत परितेवाडी जि. प. शाळा, सोलापूर विज्ञान केंद्र, सोलापूरचे सिंहगड इन्स्टिटय़ूट आणि जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यापैकी कोणत्याही ठिकाणी एन्ट्री मस्टर, उपस्थिती पत्रक, शेरे बुक इत्यादीपैकी एकही अधिकृत नोंद उपलब्ध झाली नाही. तसेच डिसले हे या कालावधीतील अधिकृत अभिलेखे सादर करू शकले नाहीत, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.