डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

अवघड क्षेत्रातील जोखीम असलेली सेवा...

 महाराष्ट्र राज्यात अनेक वर्षांपासून दुर्गम व कठीण भागातील अर्थात अवघड क्षेत्रातील सेवा करणाऱ्या शिक्षकांना २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन आदेशाने खरा न्याय मिळाला.  मात्र गेल्या २ वर्षापासून बदल्या न झाल्याने अवघड क्षेत्रात ५ वर्ष सेवा करण्याची मजबुरी या शिक्षकांवर आलेली आहे.





          निकषात वेळोवेळी बदल होत अवघड संकल्पना जरी बदलण्याचा प्रयत्न  होत असला तरी वास्तव जी भौगोलिक परिस्थिती आहे तीच सर्वाधिक परिणाम या अवघड क्षेत्रावर करत असते. ना तर राष्ट्रीय महार्मागापासूनचे अंतर ना तर फोन लागतो की नाही....

    माझी २०१८ पासून या क्षेत्रात बदली असून सतत अशा परिस्थितीत सेवा बजावतांना अनेक गंभीर अडचणींचा सामना करावा लागतो. काल झालेला परिणाम आपण फोटोत पाहू शकता हे काही पहिल्यांदा नाही गेल्या वर्षी ३ वेळेस असच काही झाले. 2 D मध्ये जग कसे दिसते हे लक्षात येथे व 3 D न पाहू शकत असल्याने टु व्हिलर वर घरी येतांना रस्त्यावरील चढ उतार व गड्डे ही लवकर न दिसल्याने सर्वांधिक जोखीम हीच म्हणावी लागेल. या भागात येत असतांना अनेकदा मधमाशी चावा घेतात. मधमाशींचा होणारा हा त्रास २ -३ दिवस फारच कष्टदायी होतो. या व्यतिरिक्त  पक्के रस्ते नसल्याने अरुंद केवळ ६ फुटाच्या वाटेवर वाहन चालवितांना दोन्ही बाजूने २ फुट उंचीचे गवत असल्याने अचानक वाहनापुढे किंग कोबरा  ते ही अगदी ६ -७ फुटाचे लांबी असलेले हे तर अंगावर शहारे आणून सोडतात ५-६ वेळा अगदी गाडीसमोर आडवे तर एकवेळेस पायाजवळ अगदी दिड फुटावर की ज्याने उसळी घेतलीच होती केवळ नशीब बलवत्तर म्हणून काही अनुचित घडले नाही. 

     सततचा खडकाळ मार्ग व तिन्ही ऋतूचा भडीमार या परिस्थितीला अतिशय बिकट बनवतात.अवघड  परिस्थितीत शिक्षण गंगा पोहचविणाऱ्या माझ्या तमाम शिक्षक बांधवांना मानाचा मुजरा....   शासन , संघटना व प्रशासन या सर्वांनी अवघड क्षेत्राचा सकारात्मक विचार करावा हीच माफक अपेक्षा ....


      प्रकाशसिंग किसनसिंग राजपूत 

            सहशिक्षक 

जि.प.प्रा.शा.मुरुमखेडावाडी 

 कें करमाड, ता / जि . औरंगाबाद

    9960878457



२ टिप्पण्या:

sadananddongare@blogspot.com म्हणाले...

2022 मध्ये प्रसिध्द झालेल्या अवघड क्षेत्रातील शिक्षक बदलीसाठी अधिकार प्राप्त म्हणून ग्राह्य धरले पाहिजेत.

केंद्र जुने धडगाव म्हणाले...

सर, आंतरजिल्हा बदलीने मी स्व जिल्ह्यात बदलून आलो.या आधीच्या जिल्ह्यात जवळपास पाच वर्षे दुर्गम भागात सेवा केली, आणि इकडे सुद्धा दुर्गम भागात नियुक्ती मिळाली.जवळजवळ नऊ वर्षे दुर्गम भागात सेवा झाली.बदल्या न झाल्याने माझ्या संसाराची गणितच बदलून गेलंय.