✊✊✊✊✊✊✊
*📢शिक्षकांना फक्त शिकवू द्या,,!*
*📢सरकारी शाळा टिकवू द्या,,!*
*🌀विविध प्रलंबित मागण्यासाठी शिक्षकांचा मोर्चा ८ ऑगस्ट २०२२ रोजी,विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार!!!🌀*
औरंगाबाद प्रतिनिधी:-जिल्हा परिषद शिक्षक समन्वय समितीच्यावतीने ८ ऑगस्ट २०२२ सोमवारी रोजी क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व विभागीय आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे. *आम्हाला फक्त शिकवू द्या, सरकारी शाळा टिकवू द्या,,!*
शिक्षकांचे,बालकांचे व शाळेचे विविध प्रकारचे सुमारे 30 प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.
🌀 यामध्ये 1 नोव्हेबर2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व शिक्षक व कर्मचा-याना जुनी पेन्शन योजना लागू करावी,
🌀प्रदीर्घ काळापासून प्रलंबित शिक्षण विस्तार अधिकारी,केद्रप्रमुख, मुख्याध्यापक,विषय शिक्षक पददोन्नत्या तात्काळ करा.
🌀औरंगाबाद जिल्हा परिषद राज्यात पदोन्नती करण्यास बारा तेरा वर्ष लावते,कायम पिछाडीवर आहे,उदासीन आहे म्हणून; विलंबाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा.
🌀शिक्षक आमदार मतदारसंघात प्राथमिक शाळेत शिक्षकांना मतदानाचा हक्क द्यावा,खाजगी ना हक्क,सरकारी शाळेतील शिक्षकांना हक्क नाही, आम्ही शिक्षक नाही का ?? मतदानाचा हक्क मिळावा.
🌀 जिल्हा परिषद प्रशालेत अनेक वर्षापासून वर्ग 2 व 3 चे राजपत्रित मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत.सदरील पदे तात्काळ भरण्यात यावीत.
🌀 वस्तीशाळा शिक्षकांची मुळ नियुक्ती दिनांक ग्राहय धरून सेवाजेष्टतेचा लाभ देण्यात यावा.
🌀जिल्हा व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना देय असलेली अतिरिक्त वेतनवाढ शासनस्तरावरून विनाअट देण्यात यावी.
🌀सन 2005 नंतर नियुक्त शिक्षकांचा(dcps) हिशोब देण्यात यावा व सदरील रक्कमं nps मध्ये वर्ग करण्यात यावी.
🌀सर्व शिक्षकांना कॅशलेस विमा योजना लागू करावी.
🌀 शिक्षकांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ( 10:20:30 ) लागू करावी.
🌀वरिष्ट व निवडश्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणा-या शिक्षकांना वेतनश्रेणीचा तात्काळ तीन महिन्यात लाभ देण्यात यावा.
🌀शिक्षकांना मुख्यालयी निवासाची व्यवस्था नसल्यामुळे व पाल्यांना उच्च शिक्षण सोय नसल्याने मुख्यालयी राहण्याच्या अटीतुन सुट देण्यात यावी.
🌀 राज्यात फक्त औरंगाबाद जिप कडून वेठीस धरले जात आहे,असा दुजाभाव का ?
🌀शैक्षणिक गुणवत्तावाढीच्या नावाखाली वेगवेगळया संस्थाकडून विविध उपक्रमांच्या माध्यमातुन गोंधळ निर्माण करू नये.अनाठायी टपाल कामे व उपक्रम बंद करावा.मागील काही काळापासून प्रशासन नियमीतपणे ऑनलाईन विविध प्रकारची माहिती मुख्याध्यापक,शिक्षकांकडून मागवत असते.सदरील माहितीमुळे विदयार्थ्याना अध्यापन करण्याचा महत्वाचा वेळ वाया जातो.त्यामुळे विदयार्थ्याच्या प्रगतीवर व शालेय कामकाजावर याचा परिणाम होतो.शिक्षकांना शिक्षणहक्क कायदयान्वये अध्यापनाचे काम करू दयावे.
🌀राज्यातील बहूतांश शाळांची वीज जोडणी बिल अदा न केल्यामुळे तोडण्यात आली आहे.वीज बिलासाठी पुरेसे अनुदान उपलब्ध करून दयावे.
🌀 प्रत्येक केंद्रशाळेस संगणक तज्ञ्ज्ञ व शिपाई ,लिपीकांची नियुक्ती करावी.
🌀BLO व इतर सर्व प्रकारची अशैक्षणीक कामे शिक्षकांकडून काढून घ्यावीत.
🌀सातव्या वेतन आयोगाचे दुसरा व तिसरा हप्ता तात्काळ अदा करावा.
🌀मयत डीसीपीएस धारक बांधवांचे प्रस्ताव निधी अभावी तीन वर्षापासून जि प औरंगाबाद येथे रखडलेले आहे ते प्रस्ताव त्वरित निकाली काढून मयतांच्या कुटुंबियांना आर्थिक दिलासा द्यावा.
🌀पाचवीचा वर्ग उच्च प्राथमिक शाळेला जोडून तीन वर्गास पदवीधर शिक्षक असावेत.
🌀सर्व पदवीधर शिक्षकांना पदवीधर श्रेणी लागू करावी.
🌀 प्रशाला शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या कराव्यात. सण 2014 पासून त्या करण्यात आलेल्या नाही.
🌀 एक ते सात वर्गाच्या शाळेस विनाअट मुख्याध्यापक पद मान्य करण्यात यावे.
🌀 कला ,कार्यानुभव, संगीत या विषयासाठी आंतरवासिता शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी.
🌀पंचवीस वर्षांपूर्वी निर्माण झालेली केंद्र शाळांची पुनर्रचना करून नव्याने दहा शाळांसाठी एक केंद्र निर्माण करण्यात यावे.
🌀 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना वर्ग खोल्या, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह या भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्या.
🌀 नव्याने अवघड क्षेत्रात समाविष्ट झालेल्या शाळांतील पात्र शिक्षकांना बदली प्रक्रियेत सामावून घ्यावे.
🌀वेतनातील अशासकीय कपाती (एलआयसी, पतसंस्था) आदींचे धनादेश मुख्याध्यापकांना तात्काळ देण्यात यावे.
🌀दिव्यांग कर्मचाऱ्यांना सहाय्यक तंत्रज्ञान तात्काळ उपलब्ध करून द्यावे. सर्व विभागातील दिव्यांग कर्मचाऱ्यांची स्वतंत्र बिंदू नामावली तयार करून सेवा जेष्ठता यादी तयार करावी व 4 टक्के नुसार पदोन्नती करण्यात यावी.
🌀वैदयकीय व पुरवणी देयकांची जेष्टता डावलून दोन दोन वर्षापासून देयके निेकाली न काढणा-या कर्मचा-यांची चौकशी करून कारवाई करावी व राहिलेली सर्व पुरवणी व वैद्यकीय देयके तात्काळ काढण्यात यावीत.
🌀 मुळसेवापुस्तिका अद्ययावत व पडताळणी साठी तालुका स्थरावर कॅम्प लावावेत,व सर्व नोंदी अद्ययावत कराव्यात.सेवापुस्तिकांची पडताळणी करण्यात यावी.
🌀अनुदानित शाळेतील प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकाप्रमाणे जि प च्या शिक्षकांनाही अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ मंजुर करणे.
*आदींसह विविध 35 मागण्याकडे सरकारचे व वरिष्ठ अधिकारी कार्यालयाचे लक्ष केंद्रित करण्यात येणार आहेत.असा निर्धार सर्वानुमते 13 शिक्षक संघटनांनी केला आहे.*
*शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी.......!*
*शिक्षकांच्या सन्मानासाठी........!*
*शिक्षक समन्वय समिती औरंगाबाद
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
✊✊✊✊✊✊✊
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा