मुलाला शाळेत ओरडल्याने त्याचा बदला घेण्यासाठी मुख्याध्यापकाला शाळेच्या आवारात मारणाऱया पालकांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला. मुख्याध्यापकांना शाळेच्या आवारात मारणे हे गंभीर असून याचा परिणाम शाळेच्या शिस्तीवर होऊ शकतो.
नाशिकच्या चांदवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाने एका विद्यार्थ्याला मारल्याने तसेच ओरडल्याने संतप्त झालेल्या पालकांनी शाळेच्या आवारात शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या समोरच मुख्याध्यापकाला मारहाण केली.
रिटर्न ३१ जुलै भरणा करावे लागणार...पहा सविस्तर पर्यत
तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी पालकांविरोधात आयपीसी कलमांतर्गत 27 डिसेंबर 2018 रोजी एफआयआर नोंदवण्यात आला. हा एफआयआर रद्द करण्याची मागणी करत पालकांनी अॅड. सुरेश साब्रड यांच्यामार्फत याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. याप्रकरणी मुख्याध्यापकांच्या वतीने अॅड. अमेय सावंत यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. न्यायालयाने गुह्याचे गांभीर्य लक्षात घेत याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास नकार दिला व गुन्हा रद्द करण्याची मागणी फेटाळून लावली.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा