डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

पूर्ण शुल्क राज्य सरकार भरणार

 कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत पूर्ण शुल्क राज्य सरकार भरणार आहे. त्यासाठी कोणताही वेगळा निर्णय करण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधानसभेत दिली.



कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी आणि पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्याच्या निर्णयाबद्दल शासनाने कोणती कार्यवाही केली, याबाबतचा प्रश्न काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांनी विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना पाटील म्हणाले, कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी आणि पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतची संपूर्ण फी माफ करण्याबाबत सर्व अकृषी विद्यापीठांना निर्देश देण्यात आलेले आहेत. 

आंतरजिल्हा बदली यादी पहा....

आतापर्यंत 931 पदवी अभ्यासक्रमातले विद्यार्थी, 200 पदवी अभ्यासक्रमातले विद्यार्थी आणि 228 पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थी यांना 2 कोटी 76 लाख 84 हजार 222 रक्कम वितरीत करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: