डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

"त्यांची बदली ही प्रणाली" द्वारे होणारच..

 अवघड क्षेत्र -


2019 मध्ये प्रसिद्ध केलेल्या अवघड क्षेत्रातील शाळांच्या यादीप्रमाणे शिक्षकांची मागील सेवा विचारात घेतली जाईल. व बदली प्रक्रियेत पर्याय निवडताना 2022 नुसार प्रसिद्ध केलेल्या अवघड क्षेत्रातील शाळांची यादी विचारात घ्यावी लागेल.

सर्वसाधारण क्षेत्र-


वरील अवघड क्षेत्रात न मोडणारी गावे ही सर्वसाधारण क्षेत्रात मोडते.

बदली वर्ष -


शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे बदली वर्ष म्हणजे ज्या कॅलेंडर वर्षाच्या दिनांक 31 मे पर्यंत बदल्या करावयाच्या आहेत ते वर्ष परंतु 2022 रोजी काढलेल्या पत्रा हे वतली वर्ष 30 जून पर्यंत वाढवलेले आहे बदलीसाठी निश्चित करावयाची सेवा अवघड क्षेत्रनिहाय व सर्वसाधारण क्षेत्र निहाय बदली वर्षाच्या दिनांक 30 जून पर्यंत पूर्ण झालेली एकूण सलग सेवा शिक्षक जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत असलेले प्राथमिक शाळेचे प्राथमिक शिक्षक अथवा मुख्याध्यापक

बदली प्राधिकारी -


शिक्षकांच्या बदल्यांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील.

डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र एकमेव शाळाकेंद्रित समूह ...Go Digital, Go Green, Use Solar

बदलीचे अधिकार पात्र शिक्षक-


या शिक्षकांशी विद्यमान शाळा ही अवघड क्षेत्रात आहे व त्यांची तेथील सलग सेवा ही तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली आहे असे बदली अधिकार मात्र शिक्षक आहेत.

विशेष संवर्ग भाग १ व विशेष संवर्ग भाग 2 -


या संवर्गात कोणते शिक्षक येतील याची माहिती शासन निर्णय नमूद केली आहे .शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे त्याच प्राधान्य क्रमाने त्यांच्या बदल्या केल्या जाते.

बदली पात्र शिक्षक -


ज्या शिक्षकाची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित करावयाची सलग सेवा दहा वर्ष पूर्ण झालेली आहे .आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा पाच वर्ष पूर्ण झालेली आहे. अथवा ज्या शिक्षकाची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित करावयाची सलग सेवा दहा वर्ष पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा पाच वर्षे पूर्ण झालेली आहे असे शिक्षक दहा प्लस पाच वर्ष कुठल्याही क्षेत्रात म्हणजेच अवघड असल्यास उगम क्षेत्रात पूर्ण झालेली असेल तर तो शिक्षक बदली पात्र आहे "त्यांची बदली ही प्रणाली"  द्वारे होणारच.. अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राथमिक भरणे आवश्यक असल्याने सेवाजेष्ठता विचारात घेऊन दहा वर्ष पूर्ण केलेल्या शिक्षकांना वास्तव्य जेष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदली करून प्रस्थापित करण्यात येईल बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यावरही अवघड क्षेत्रातील जागा रिक्त राहिल्या असल्यास त्या भरण्यासाठी सर्वसाधारण क्षेत्रात ज्या शिक्षकांची दहा वर्ष पूर्ण झालेली आहे अशा शिक्षकांची निवड होईल. त्याला विद्यमान शाळेत पाच वर्षे पूर्ण असण्याची अट लागू होणार नाही.

बदली प्रक्रिया कशी राबवली जाईल याचा क्रम -


👉प्रक्रिया सुरू करण्याअगोदर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याद्वारे जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील यादी प्रसिद्ध केली जाईल.

👉त्यानंतर शिक्षण अधिकारी बदली पात्र व बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या याद्या जाहीर करतील.

👉गटशिक्षणाधिकाऱ्यांना आपल्या तालुक्यातील  तालुका निहाय व शाळा निहाय शक्यतो समप्रमाणात निश्चित कराव्यात समानिकरण करण्यासाठी भरती किंवा अतिरिक्त खाजगी शिक्षकांच्या समायोजनाद्वारे उपलब्ध झाल्याशिवाय समुपदेशनासाठी खुली करता येणार नाही. हे रिक्त पदांची यादी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याद्वारे प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर ज्या शिक्षकांना विशेष संवर्ग भाग एक व भाग दोन चा लाभ घ्यायचा आहे त्यांनी पोर्टलवर अर्ज भरायचा आहे.

👉त्यानंतर विशेष संवर्ग एक व दोन बदली पात्र तसेच बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध होतील.

👉शासन निर्णयाप्रमाणे उपरोक्त नमूद याद्या प्रसिद्ध झाल्यापासून पाच दिवसात शिक्षण अधिकाऱ्यांकडे दुरुस्तीसाठी अर्ज करावयाचा होता व शिक्षण अधिकाऱ्यांना सात दिवसात निकाल द्यायचा होता तसेच शिक्षकांना शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णय अमान्य असेल तर ते मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अर्ज पुढील पाच दिवसात करू शकतील व मुख्य कार्यकारी अधिकारी सात दिवसात निकाल देऊ शकतील परंतु टप्पा क्रमांक एक मध्ये आधीच आपण शिक्षकांच्या प्रोफाईलवर सार्वजनिक आक्षेप ही सुविधा दिली होती.
त्यामुळे आरटीडीने 29 जून 2022 रोजी जाहीर केलेल्या पत्रात उपरोक्त नमूद याद्यांवर आक्षेपाची प्रक्रिया संक्षिप्त केलेली आहे याद्या प्रसिद्ध झाल्यापासून शिक्षक दिन दिवसात शिक्षण अधिकाऱ्यांकडे अर्ज करू शकतील व शिक्षण अधिकारी चार दिवसात निर्णय देऊ शकतील तसेच शिक्षकांना हा निर्णय मान्य नसेल तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पुढील दोन दिवसात अर्ज करू शकता व मुख्य कार्यकारी अधिकारी तीन दिवसात आपला निकाल जाहीर करू शकतात.

पसंतीक्रम विशेष संवर्ग भाग १


सर्वात प्रथम विशेष संवर्ग भाग एक शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम देण्यासाठी तीन दिवसांचा अवधी देण्यात येईल कमीत कमी १ शाळा व जास्तीत जास्त ३० शाळांचे पसंती क्रम देणे आवश्यक आहे. शिक्षकांचे नाव बदली पात्र यादीमध्ये असेल तर त्यांना बदली नको असेल तर ते शिक्षक विशेष संवर्ग भाग एक मधून अर्ज करू शकता शिक्षकांनी या अंतर्गत बदलीचा लाभ घेतल्यानंतर पुढील तीन वर्षे विनंती बदलीसाठी ते अर्ज करू शकत नाही. शासन निर्णयात विशेष संवर्ग भाग एक साठी नमूद केलेल्या प्राधान्यक्रमाप्रमाणेच तसेच सेवा जेष्ठता जन्मतारीख आडनावातील पहिले इंग्रजी वर्ण अक्षर यानुसार प्राधान्य दिले जाईल प्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा सुधारित रिक्त पदांची यादी जाहीर केली जाईल. शिक्षकांना त्यांच्या विनंतीवरूनच बदली देण्यात येईल या अंतर्गत शिक्षकांची बदली बदली पात्र शिक्षकांच्या जागी होईल .

पसंती क्रम विशेष संवर्ग भाग २


विशेष संवर्ग भाग दोन शिक्षकांना त्यांच्या पसंतीक्रम देण्यासाठी तीन दिवसांचा अवधी देण्यात येईल कमीत कमी एक शाळा व जास्तीत जास्त 30 शाळांचे पसंती क्रम देणे आवश्यक आहे जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर दोघांपैकी एकाच या संवर्गासाठी अर्ज करू शकतो शासन निर्णयात विशेष संवर्ग भाग दोन साठी नमूद केलेल्या प्राधान्यक्रमाप्रमाणे तसेच सेवा जेष्ठता जन्मतारीख आडनावातील पहिले इंग्रजी वर्ण अक्षर यानुसार प्राधान्य दिले जाईल शिक्षकांनी   या अंतर्गत बदलीचा लाभ घेतल्यानंतर पुढील तीन वर्ष बदलीसाठी त्यांना अर्ज करता येणार नाही प्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा सुधारित रिक्त पदांची यादी जाहीर केली जाईल असं ती क्रम बदली अधिकार पात्र बदली अधिकार पात्र शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम देण्यासाठी तीन दिवसांचा अवधी देण्यात येईल त्यांना ती शाळांचा पसंती क्रम देणे आवश्यक आहे सेवा जेष्ठता बसल्यास या बदली पात्र शिक्षकांच्या जागेवर विनंतीतील प्राधान्यक्रमानुसार करण्यात येतील या शिक्षकांनी जर बदलीसाठी पसंती क्रम दिला नाही आणि हे शिक्षक बदलीस पात्र शिक्षक नसते तर त्यांची बदली होणार नाही बदली प्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा सुधारित रिक्त पदांची यादी जाहीर केली जाईल पसंती क्रम बदली पात्र सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करून बाकी सर्व शिक्षकांना त्यांचा पसंती क्रम भरण्यासाठी तीन दिवसांचा अवधी देण्यात येईल सेवा जेष्ठता जन्मतारीख आडनावातील पहिले इंग्रजी वर्ण अक्षर यानुसार प्राधान्य देऊन पसंतीप्रमाणे बदली होईल या शिक्षकांनी जर बदलीसाठी पसंती क्रम दिला नाही तर उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची नियुक्ती केली जाईल या शिक्षकांनी किमान 30 अथवा आधीचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंती क्रम देणे अनिवार्य आहे पसंती क्रम विस्थापित शिक्षक सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करून उरलेल्या सर्व शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी अथवा बदलण्यासाठी तीन दिवसांचा अवधी देण्यात येईल या शिक्षकांनी 30 अतिरिक्त असलेल्या जागांचा पसंती क्रम देणे अनिवार्य आहे सेवा जेष्ठता जन्मतारीख आडनावातील पहिले इंग्रजी वर्ण अक्षर यानुसार प्राधान्य देऊन बद ली या शिक्षकांनी जर बदलीसाठी पसंती क्रम दिला नाही अथवा प्राधान्यक्रमाप्रमाणे जागा उपलब्ध नसल्या तर उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची नियुक्ती केली जाईल बदली आदेश सर्व प्रक्रिये नंतर प्रणालीद्वारे जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया राबवली जाईल व शिक्षकांचे बदली आदेश प्रकाशित केले जातील अशा प्रकारे संपूर्ण जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया राबवली जाईल त्यांना शासन निर्णय अथवा ऑलरेडीने वेळोवेळी जाहीर केलेली पत्रके महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेली आहे शिक्षकांना कुठल्याही मुदतीबद्दल अथवा तारखे बद्दल अथवा जिल्हा अंतर्गत प्रक्रियेबद्दल शंका असतील किंवा प्रश्न असतील त्यांनी या संकेतस्थळावर जाऊन सर्व शंकांचे निवारण करून घ्यावे ,

 प्रकाशसिंग राजपूत 
(समूहनिर्माता) 
डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र 
औरंगाबाद 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: