मराठी काव्य रसिकांकरिता मी प्रकाशसिंग राजपूत माझी एक काव्यरचना आपणासाठी घेऊन येत आहे. मराठी काव्य मनास मंत्रमुग्ध करणारा प्रकार मनातील भाव व्यक्त करणारा अनेक भावनांना एकत्र जपणारी शब्दांची माळ ...
आता Flipkart वर माझे पुस्तक खरेदी करा... आपल्या प्रियजनास भेट देण्यास उत्तम...खास १०%सवलती दरात
साफल्य.....
जगण्याची प्रीत ह्या जीवना,
राखूनी मनी किती वेदना,
असह्य काळ जरी टळेना,
सौदार्य स्वतःशी दावेना,
उरात दाटे अवेहलना,
कीर्तीचे नातं हे कळेना,
फिरुनी जगी मन भरेना,
साफल्य कधी लाभेलना,
अंतकरणास रुप भावेना,
उदासी अखेर मिटेलना,
दीव्यत्वाची ओढ मना,
तेज कर्तुत्वाचा उभारेलना....
सोडीत ज्वलंत भावना,
कुणास का मी कळेना,
विराम माझ्याच जीवना,
प्रिये तुला मी दिसेना.....
✒️ *प्रकाशसिंग राजपूत*✒️
औरंगाबाद
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.