Header add

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ११ सप्टेंबर पासून

 प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ११ सप्टेंबर पासून


जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्यानंतर आता जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया रविवारपासून म्हणजेच ११सप्टेंबर पासून  सुरू होणार आहे. राज्यात जिल्हा परिषदांतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया नुकतीच झाली. त्यात जवळपास ४००० शिक्षक हे इतर जिल्ह्यांत बदलून गेले आहेत. 

 त्यानंतर आता जिल्हांतर्गत बदल्यांना सुरुवात होणार आहे. प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी रविवारपासून ऑनलाईन माहिती भरण्यास सुरुवात होईल .

शिक्षकाने दिला राजीनामा... पहा सविस्तर...

 आंतरजिल्हा बदली होऊन  जिल्ह्यात आलेल्या अनेक  जणांना अद्याप शाळा देण्यात आलेल्या नाहीत. त्यांचे समुपदेशन होईल त्यानंतर त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. शिक्षकांच्या बदल्यांसाठी वेळापत्रक निश्चित केले जाणार असून त्यानुसार बदल्यांची प्रक्रिया पार पडणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Google Lab

Blogger द्वारे प्रायोजित.