डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

आम्ही चिमुकले आमचा वर्ग आवरतो...😄

   विद्यार्थ्यांना एकविसाव्या शतकातील कौशल्य प्राप्त करणे शिक्षण प्रणालीचे उद्दिष्टे झालेले आहे.

 आपण सहजच अनेक कृतीतून विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यांना जोपासणी करु शकतो, जसे क्रिटिकल थिंकिंग ,कोलाब्रेशन, क्रिएटिव्हिटी या सर्व सहज घडून येणाऱ्या कृतीतून विद्यार्थ्यांना आत्मसात होणाऱ्या बाबी असून इ कौशल्य आत्मसात झाल्यास उद्याच्या युगासाठी सक्षम असे विद्यार्थी आपले तयार होणार आहेत.

 आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरूमखेडा वाडी येथे आम्ही असंच विद्यार्थ्यांना एकजुटीने काम करण्यासाठी आणि स्वच्छतेचे महत्त्व लक्षात राहण्यासाठी ज्ञानरचनावादी साहित्याची साफसफाई व व्यवस्थित मांडणी करण्याचे काम सोपविले .

तेव्हा पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांची फौज ही सर्व कामे करताना त्यांची होणारी तारांबळ परत पुन्हा पुन्हा करण्यात येणारा प्रयत्न व एकमेकांशी होणारा संवाद हा काही अजबच अनुभव देणारा ठरलेला आहे .

आपण खालील व्हिडिओमध्ये पाहू शकतात विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे स्वच्छता करत साहित्याची व्यवस्थित मांडणी केलेली आहे.

 प्रकाश सिंग राजपूत 

सहशिक्षक 

जि प प्रा शा मुरूमखेडावाडी 

केंद्र करमाड तालुका जिल्हा औरंगाबाद




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: