शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे त्याच प्राधान्य क्रमाने त्यांच्या बदल्या केल्या जातील .
बदलीपात्र शिक्षक-
ज्या शिक्षकाची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित करावयाची सलग सेवा दहा वर्ष पूर्ण झालेली आहे .
आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा पाच वर्ष पूर्ण झालेली आहे, अथवा ज्या शिक्षकाची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित करावयाची सलग सेवा दहा वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा पाच वर्षे पूर्ण झालेली आहे .
असे शिक्षक दहा + पाच(10+5) वर्ष कुठल्याही क्षेत्रात म्हणजेच अवघड अथवा सुगम क्षेत्रात पूर्ण झालेली असेल तर तो शिक्षक बदलीपात्र आहे.
बदली पात्र शिक्षकांची बदलीतून सुटका यावेळी होणार नाही त्यांची बदली ही प्रणाली द्वारे होणारच...
अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राधान्याने भरणे आवश्यक असल्याने सेवाजेष्ठता विचारात घेऊन दहा वर्षांपूर्वी केलेल्या शिक्षकांना वास्तव्य जेष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदली करून प्रस्थापित करण्यात येईल .
अवघड क्षेत्रातील सुंदर शाळा जि.प.प्रा.शा.मुरूमखेडावाडी, औरंगाबाद |
बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यावरही अवघड क्षेत्रातील जागा रिक्त राहिल्या असल्यास त्या भरण्यासाठी सर्वसाधारण क्षेत्रात ज्या शिक्षकांची दहा वर्ष पूर्ण झालेली आहे अशा शिक्षकांची निवड होईल त्याला विद्यमान शाळेत पाच वर्षे पूर्ण असण्याची अट लागू होणार नाही.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा