सरकार झेडपीच्या शाळा ग्रामपंचायतींच्या ताब्यात देणार असल्याची चर्चा आहे.
यासंदर्भात शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी मुंबईत याची माहिती दिली. तिसरीपासून आठवीपर्यंत परिक्षा नियमित घेतल्या जाणार आहेत, अर्थात नापास न करण्याची प्रक्रिया मात्र तूर्तास कायम ठेवली जाणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे. सध्या हा सर्व प्रकल्प राज्य सरकारच्या विचाराधीन आहे, लवकरच शिंदे- फडणवीस सरकार त्यावर निर्णय घेईल असे शिक्षणमंत्री केसरकर यांनी सांगितले.
केरळमध्ये शिक्षणाबाबत खूप चांगले व यशस्वी मॉडेल तयार करण्यात आले असून तेथे शाळा ग्रामपंचायतींकडे सोपवल्या आहेत. महाराष्ट्रातही ग्रामपंचायतींकडे शाळा सोपविण्याचा सरकारचा विचार आहे. त्यातून स्थानिक ठिकाणच्या समस्या व त्यावर स्थानिक ठिकाणचे नियंत्रण या महत्वाच्या गोष्टी घडतील.
बदली अर्जबाबत...
सध्या झेडपीचे शिक्षक हे शाळा व्यवस्थापन समिती असली तरी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी किंवा ग्रामस्थ.शिक्षक विद्यार्थीकेंद्रीत असतात, तिथे मात्र स्थानिक ग्रामस्थ व पालकांचे संबंध चांगले राहतात, त्याचा विचार करता शाळांमधील वातावरण स्थानिक ठिकाणच्या परिस्थितीनुसार सुरळीत राहण्यासाठी व शिक्षकांवर वेळेचे, अभ्यासाचे नियंत्रण राहण्यासाठी ग्रामपंचायतींकडील नियंत्रण महत्वाचे ठरेल असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.