सोलापूर मधील कोंडी येथील शाळेतील आठवी ते दहावीचे वर्ग वाढवण्यासाठी हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी सुनावली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली होती. लोहार यांच्या अन्य मालमत्तेची चौकशी करण्यात येणार आहे.
कोल्हापूर शिक्षक वसाहतीतील त्यांच्या निवासस्थानाची तपासणी झालेली नाही. दोन-तीन दिवसांमध्ये ती केली जाणार आहे.
1 Comments:
तुम्ही भ्रष्टाचार करा, तो तुमचा प्रश्न.. देव तुम्हाला द्यायची ती शिक्षा तुमची वेळ आल्यावर नक्की देईलच.
पण एखाद्या व्यक्तीचे, शिक्षकाचे प्रामाणिकपणे काम करून दिल्याने तुमची भ्रष्ट आवक थांबली असेल तर त्या वेळी त्या काम करून देणाऱ्या व्यक्तीचा तुम्ही राग करून छळ करण्याचा प्रयत्न देखील तुम्ही करता. अशा प्रकारच्या अपराधासाठी तुमच्यासारख्या इतर असंख्य भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना कोणती शिक्षा दिली गेली पाहिजे..
एखाद्या व्यक्तीमुळे तुमचा भ्रष्टाचार रोखला गेला असल्यामुळे तुम्ही तुमच्या पदाचा गैरवापर करून त्या व्यक्तीचा जो राग करताय,खालची पातळी गाठता आहे. त्यामुळे तुमची लायकी सर्वांना समजली असेल.. असो तरीदेखील देव तुमचे भले करो..
टिप्पणी पोस्ट करा