डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

तुमचे अंकाऊट कोण वापरत आहे का?हे सेटिंग करा?


 

तूमचे व्हॉट्सॲप मॅसेज कोणी वाचत तर नाही ना?

 संदेशवहन  गतिमान करणारे ॲप म्हणजे व्हाट्सअप आणि या व्हाट्सअप मध्ये नवीन नवीन फीचर्स येत आहे. आत्ताच व्हाट्सअप  नवीन फिचर  दिलेले आहे की आता 32 जणांना आपण ग्रुप व्हिडिओ कॉल करू शकतो यासाठी तुम्हाला तुमचं व्हाट्सअपचे  वर्जन अपडेट करून घ्यावे लागणार आहे .

याचबरोबर ग्रुपची सदस्य संख्या वाढली असून 1024 सदस्य आता ग्रुप मध्ये ऍड करता येणार आहे हे सर्व वापरत असताना तुमचा अकाउंट जर कोणी त्यांच्या डिवाइसला जोडून घेतला आहे का हे पहा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं झालेलं आहे.


व्हॉट्सॲपवेब आणि मल्टी-डिव्हाइस सपोर्ट यासारख्या व्हॉट्सॲप फीचर्सचे नावे तुम्ही ऐकली असतील. तुम्ही त्याचा वापरही करत असाल. या ॲपच्या मदतीने, तुम्ही एकाच वेळी दोनपेक्षा अधिक डिव्हाइसवर  एकच व्हॉट्सॲप वापरू शकता.

जर एखाद्या व्यक्तीने तुमचा फोन घेऊन दुसर्‍या डिव्हाइसवर लॉग इन केले तर तो तुमचे संदेश सहजपणे वाचू शकेल. हे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲपवर काही सेटींग्स करू शकता. ज्यामुळे तुमचे मॅसेज प्रायव्हेट राहतील.

तुमचे अंकाऊट कोण वापरत आहे का?हे सेटिंग करा?

एखाद्याने तूमच्या व्हॉट्सॲपवर लॉगइन केले होता का हे पाहण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सॲप ओपन करावे लागेल. येथे तुम्हाला लिंक्ड डिव्हाइस Linked Deviceचा पर्याय मिळेल.

त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तूमचे व्हॉट्सॲप कोण कोणत्या डिव्हाइसला लॉग-इन केले आहे याचे डिटेल्स मिळतील. जर ऑनलाईन नसूनही तूमचे व्हॉट्सॲप लॉग इन दिसत असेल.तर,तूम्ही त्यातून लॉग आउट होऊ शकता.आजच्या युगात सावधगिरी बाळगणे यास शाहनपण म्हणता येईल...


   प्रकाशसिंग राजपूत 

   औरंगाबाद