कोणी हे गीत गायन करण्यास व निर्मिती करण्यास तयार असल्यास नक्कीच संपर्क करावा.
गीतलेखन
प्रकाशसिंग राजपूत
9960878457
*कडेकपारी शौर्य जागवी....*
राजं... जी रं... राजं छत्रपती शिवाजीराजं,
कडेकपारी शौर्य जागवी,
मर्द मावळे लढव्ये घडूनी,
घडला स्वाभीमानी हा राष्ट्र ....
राजं... जी रं... राजं छत्रपती शिवाजीराजं,
उचलली विजयी पताका,
स्वराज्याचे तोरण बांधुनी,
गनिमाला न झुकता करी एल्गार,
मावळा इथे शौर्यवान लढुनी,
राजं... जी रं... राजं छत्रपती शिवाजीराजं,
गडकिल्ले करूनी बळकट ,
राजं आणली नविन आंधी,
आई भवानीचा घेऊनी आशीर्वाद ,
माॕ साहेबांचा राखला मान ,
राजं... जी रं... राजं छत्रपती शिवाजीराजं,
सह्याद्रीचा गनिमास धाक,
सिंहासनावर झाले विराजमान,
प्रजेला मिळत आराध्य दैवत,
हृदयी एकच शिववंदन गायी...
राजं... जी रं... राजं छत्रपती शिवाजीराजं,
🚩 *जय शिवाजी जय भवानी*🚩*
✒️ *प्रकाशसिंग राजपूत*✒️
*छत्रपती संभाजीनगर*
📲9960878457
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.