डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

बदली फाॕर्म withdrawal बाबत

*बदली पोर्टल 2022*

*पोर्टलवर form withdrawal सुविधा उपलब्ध*


✳️ *Form Withdrawal सुविधा*


➡️ *दिनांक 21 डिसेंबर ला ज्या विशेष संवर्ग-1 च्या शिक्षकांनी प्राधान्यक्रम सबमिट केलेत त्यांना एक ईमेल प्राप्त झाला असेल*. *त्या ईमेल मध्ये आपण पोर्टलवर नोंदवलेला प्राधान्यक्रम उलट सुलट असल्याचे दिसून येत आहे म्हणजेच प्राप्त झालेल्या ई-मेल मधील pdf मध्ये प्रिंटिंग समस्या दिसून येत आहे पोर्टलवरील त्यांचा फॉर्म योग्य आहे परंतु pdf मधील प्रिंटिंग समस्येमुळे आपले समाधान होत नाही व आपणास प्राप्त होणारी pdf ही योग्य असणे आवश्यक आहे*

➡️ *शिक्षक, पोर्टलमध्ये लॉग इन करून याची शहानिशा करू शकतात आणि तुमचा प्राधान्यक्रम योग्य आहे की नाही ते पुन्हा तपासू शकतात*. 


➡️ *तरीसुद्धा आपले समाधान होत नसेल किंवा आपल्या प्राधान्यक्रमामध्ये काही चुका झाल्या असल्यास  आपण आपला फार्म त्याखाली विथड्रॉल (Withdrawal)या tab वर क्लिक करून आपला फॉर्म मागे घेऊ शकता* *व पुन्हा प्राधान्यक्रम भरून फॉर्म सबमिट करू शकता तशी सुविधा पोर्टलवर देण्यात आलेली आहे*


✳️ *बदली पोर्टल अपडेट*


➡️ *जिल्हातंर्गत बदली पोर्टलवर सध्या दिनांक 21 डिसेंबर 2022 ते 24 डिसेंबर 2022 दरम्यान विशेष संवर्ग भाग एक मध्ये येणाऱ्या शिक्षकांच्या बदली अर्ज संदर्भात शाळांचा प्राधान्यक्रम देण्याची प्रक्रिया सुरू आहे.*


➡️ *विशेष संवर्ग भाग एकच्या शिक्षकांनी ज्या शिक्षकांना बदली नको होती अशा शिक्षकांनी पोर्टलवर नकार नोंदवलेला आहे नकार नोंदवलेल्या शिक्षकांना पोर्टलवर कोणतेही प्रकारची नोंद करण्याची गरज नाही*


➡️ *परंतु ज्या विशेष संवर्ग भाग एकच्या बदली पात्र नसलेल्या शिक्षकांनी बदलीसाठी होकार दर्शविलेला आहे अशा शिक्षकांना पोर्टलवर एकही सोयीची शाळा नसेल तरीसुद्धा कमीत कमी एक शाळेचा प्राधान्यक्रम भरून आपला फॉर्म सबमिट करावा*


➡️ *कारण  अगोदरच संवर्ग एक मधून अर्ज भरण्यासाठी होकार किंवा नकार दर्शवण्यासाठी संधी मिळाली होती त्या संधीतून आपण होकार दर्शवल्यामुळे आपल्याला आता आपल्या शाळेवरून दुसऱ्या शाळेवर जाण्यासाठी दुसऱ्या शाळांचा प्राधान्यक्रम देणे आवश्यक आहे.*


➡️ *त्यामुळे आहे त्या शाळेवरून आपणास बदली नको असेल तर आपणास न मिळणाऱ्या शाळेचा एक प्राधान्यक्रम भरून फॉर्म सबमिट करावा*


अवघड क्षेत्रातील खडतर प्रवास 



➡️ *असे केल्याने आपणाकडे फॉर्म भरण्याचा प्रूफ राहील*


➡️ *परंतु आपण फॉर्म सबमिट न केल्यास इतर कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून किंवा जर आपणास  सर्वसाधारण क्षेत्रातील एकूण सेवा दहा वर्ष व एका शाळेवर तीन वर्ष सेवा झालेली असेल तर आपण सर्वात शेवटच्या राऊंडमध्ये अवघड क्षेत्रातील शाळा रिक्त राहिल्यास तेथे आपले नाव यादी देण्याची किंवा आपली बदली होण्याची शक्यता आहे.*


➡️ *तसेच आपण अर्ज भरून बदलीसाठी संधी घेतल्यामुळे व पोर्टलमध्ये आपली नोंद संवर्ग एक मधील शिक्षक अशी झाल्यामुळे शेवटच्या राऊंडमध्ये अवघड क्षेत्रातील शाळा मिळण्याचे टळेल.* 


✳️ *विशेष संवर्ग भाग 1 मधील बदली पात्र शिक्षकांकरिता*


➡️ *विशेष संवर्ग भाग एक मधील शिक्षक जर बदली पात्र असतील तर त्यांची बदली ही निश्चित होईल*


➡️ *बदली पात्र शिक्षकांची बदली होत असल्यामुळे त्यांनाही याच राऊंड मध्ये बदलीने शाळा मिळणे अत्यावश्यक आहे* 


➡️ *कारण या राऊंडमध्ये आपणास शाळा न मिळाल्यास आपण विस्थापित राऊंडमध्ये जावे लागेल व गैरसोईच्या शाळा घ्याव्या लागतील*


➡️ *संवर्ग एक मधील बदली पात्र शिक्षकांना याच राऊंडमध्ये शाळा मिळण्याकरिता आपणास संवर्ग एक च्या यादीचा (Cadre 1 list) व बदली मात्र यादीचा (Eligible List) योग्य तो अभ्यास करणे गरजेचे आहे*


➡️ *संवर्ग एकच्या शिक्षकांना बदली पात्र शिक्षकांच्या शाळा ह्या त्यांच्या व्याख्येतील प्राधान्य क्रमानुसार मिळणार असल्या मुळे संवर्ग एक च्या यादीतील  (Cadre 1 list) आपला प्राधान्यक्रम व बदली पात्र यादीतील (Eligible List) उपलब्ध जागा यांचा समन्वय साधून आपण प्पसंतीक्रम भरावा जेणेकरून आपणास याच राऊंडमध्ये शाळा मिळेल*


*वरील माहिती आपल्या माहितीसाठी आहे. वरील प्रत्येक मुद्द्याशी आपण सहमत असालच असे नाही त्यामुळे आपण फॉर्म भरताना शासन निर्णयाचा व तज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यावा*

*सस्नेह धन्यवाद*

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻