राजभाषा दिनानिमित्त माझी काव्यरचना....
अल्बम ऐकण्यासाठी चित्रावर क्लिक करा व नंतर गाण्याच्या नावावर... |
*विषय - मायमराठी*
*शिर्षक- माय ही या श्वासाची...*
माय ही या श्वासाची,
शब्द हीचे आहे मधुर ,
स्वर बनुनी उमटतात,
श्रोते होतात अधीर,
बोलीभाषेची हीच जडण,
अहिरणी,वऱ्हाडी वा मालवणी,
नटवून हीस चढवितात साज,
घडतात हीचीच कास धरुनी,
शब्दाचा अखंड हीचा भंडार,
ग्रंथ बनुनी होते साठवण ,
या महाराष्ट्राचा आहे,
भाषा म्हणून तुच प्राण,
बांधणी हिची स्वर व्यंजनाची,
शब्द नी शब्द हीचा खास,
सह्याद्रीच्या सावलीत,
घडवते स्वराज्याचा इतिहास ,
बनून ओळख या मातीची,
बनली जननी या महाराष्ट्राची,
विणला आहे हिच्यात आपलेपणा,
ही भाषा आहे स्पष्टपणाची,
गंध हीचा मज फुलवितो,
करतो वंदन मनातून ,
माय मराठीची आम्ही लेकरं,
उमटले भाव कंठातून ....
*प्रकाशसिंग राजपूत*
*🚩 छ.संभाजीनगर🚩*
📲 9960878457
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.