डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

दहावीच्या बोर्ड परीक्षा Nep अंतर्गत होणार की नाही.... ?

 

मागील काही दिवसांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाबाबत  व्हॉट्सॲपवर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 



या व्हायरल मेसेजमध्ये नवीन शैक्षणिक धोरणा अंतर्गत  दहावी बोर्डाची परीक्षा घेतली जाणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

नवीन शैक्षणिक धोरणाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून त्यात काही बदल करण्यात आल्याचा दावा व्हॉट्सॲप मेसेजमध्ये करण्यात आला आहे. 

त्यात पुढे नमूद करण्यात आले आहे की, nep ने केलेल्या बदलांनुसार 10वी बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत. बोर्डाच्या परीक्षा फक्त 12वी साठी घेतल्या जातील.

चार वर्षांच्या महाविद्यालयीन पदवीसह मास्टर ऑफ फिलॉसॉफी  बंद करण्यात येणार असल्याचेही व्हायरल मेसेज निदर्शनास आले आहेत. पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्यांची मातृभाषा, स्थानिक भाषा आणि राष्ट्रभाषेतच शिकवले जाईल, असेही सांगण्यात आले आहे. 34 वर्षांनंतर शिक्षण धोरणात बदल करण्यात आल्याचे संदेशात म्हटले आहे. अशा स्थितीत या दाव्यात किती तथ्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: