बुधवार, १५ मार्च, २०२३

ही कविता फारच सुंदर आहे एकच मिशन...पेन्शन


🚩✊🚩 लढतोय आम्ही हक्कासाठी🚩✊🚩

शासकीय दरबारी आम्ही

प्रामाणिक चाकरी करतो

देशाच्या या भावी पिढीला

आम्ही शिक्षक घडवतो


अनेक अशासकीय कामे देऊन

सरकार राबवुन  घेत असते

शिकवणे हेच काम आमचे

त्यावेळी मात्र का विसरते


सगळ्यांना न्याय एक असावा

 विनंती आता करत आहोत

शांततेत राहुन मागण्यांसाठी

 हक्का साठी लढत आहोत


अन्याय आमच्यावर करु नका

सरकारी दरबारी  हवी हमी

आमची ताकद पाहताय तुम्ही

शिक्षकांना लेखु  नका  कमी


मागणी मान्य करुन आम्हाला

समान न्याय  व हक्क द्यावा

एकच पेन्शन या योजनेचा

सर्व कर्मचाऱ्यांना लाभ हवा


कवयित्री 

सुप्रिया इंगळे

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

पहा का दिला संघाच्या तालुका अध्यक्षांनी राजीनामा 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा