डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

अवघड क्षेत्र फेरीतील पसंतीक्रम भरणेबाबत

 शिक्षक बदली व्यवस्थापन प्रणालीसाठी नवीन ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे.  अवघड क्षेत्रातील फेरीसाठी शिक्षकांनी आपल्या पसंती क्रम पोर्टलवर कसा भरावा याची माहिती आम्ही देणार आहोत .

अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी ज्या शिक्षकांची सुगम क्षेत्रात दहा वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक वर्ष  पूर्ण झालेली आहे. अशा सर्व शिक्षकांची यादी यापूर्वी  विन्सिसने पोर्टलवर जाहीर केली होती .त्या यादीत विशेष संवर्ग एक मध्ये मोडत असलेले व ज्यांना बदलीतून सूट हवी आहे अशा शिक्षकांची नावे होती.
त्यांना बदलीतून सूट घेता यावी यासाठी या फेरी आधी  विशेष संवर्ग येथे अर्ज भरून घेतले होते.
त्यांचे अर्ज पडताळणीसाठी शिक्षण अधिकाऱ्यांना तीन दिवसांचा कालावधी देण्यात आला होता .ज्या शिक्षकांना बदलीतून सूट हवी होती व ज्या शिक्षकांचे अर्ज शिक्षण अधिकाऱ्यांकडून मंजूर झाले अशा शिक्षकांची नावे यादीतून वगळण्यात आली .पण ज्या शिक्षकांचे अर्ज शिक्षण अधिकाऱ्यांनी रद्द केले त्या शिक्षकांची नावे यादी तशीच राहतील. त्यानंतर शिक्षकांची सुधारित यादी पोर्टलवर पुन्हा एकदा प्रसिद्ध होईल अवघड क्षेत्रात जितकी रिक्त पदे असतील तेवढेच शिक्षकांची नावे त्या यादीत असतील यादीच्या शिक्षकांची नावे येतील त्यांना पोर्टलवर आपला पसंतीक्रम देण्यासाठी चार दिवसांचा कालावधी दिलेला आहे . 
जे शिक्षक आपला पसंती क्रम पोर्टलवर देणार नाही त्यांना त्यावेळी उपलब्ध असलेल्या जागेवर बदलीने नियुक्ती देण्यात येईल. त्यामुळे शिक्षकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या पसंती क्रम पोर्टलवर भरावा परंतु त्या पसंती क्रमाप्रमाणे साधा उपलब्ध नसतील तर त्यावेळी उपलब्ध असलेल्या जागेवर पद्धतीने नियुक्ती करण्यात येईल.
पसंतीक्रम भरण्यासाठी -
शिक्षकांनी पोर्टलवर लॉगिन करावे.
त्यातील एप्लीकेशन फॉर्म वर क्लिक केले की स्क्रीनवर डिफिकल्ट एरिया एप्लीकेशन वर क्लिक केले की अर्जदाराचे पूर्ण नाव त्याच्या शालार्थ क्रमांक व विद्यमान शाळेचा यु डायस क्रमांक दिसेल त्याखाली सिलेक्ट प्रेफरन्सेस म्हणजे पर्याय निवडा दिलेले आहे. तुम्हाला खाली रेड बॉक्स मध्ये मिनिमम चॉईसेस म्हणजे किमान पर्याय एक व मॅक्झिमम चॉईसेस म्हणजे कमाल पर्याय तीस अथवा उपलब्ध असलेल्या पर्यायांशी संख्या दिसेल तुम्ही कमाल पर्यायांपैकी किती पर्याय निवडले त्याची संख्याही येथे तुम्हाला दिसेल.खालील ड्रॉप डाऊन मधून तुम्हाला तालुका निवडायचा आहे. व त्याखालील मधून शाळा निवडायची आहे येथे पर्यायाचे बंधन नाही तुम्ही कमीत कमी एक पर्याय निवडून अर्ज सबमिट करू शकता पर्याय निवडून झाल्यावर खाली तुम्हाला एक स्वीकारण स्वीकारावे लागेल त्यात असे नमूद केले आहे की मी दिलेल्या पसंती क्रमाप्रमाणे पद उपलब्ध असेल तर मला त्या जागेवर नियुक्ती मिळेल परंतु माझ्या पसंती क्रमाप्रमाणे जागा उपलब्ध नसतील तर उपलब्ध जागेवर माझी बदलीने नियुक्ती केली जाईल हे मला मान्य आहे तुम्ही चेक बॉक्स चेक केला की तुम्हाला सेव व सबमिटचे बटन दिसू लागेल तुम्ही तुमचे पर्याय सेव करून ठेवू शकता सबमिट बटन वर क्लिक केले की ओटीपी प्रविष्ट करून फॉर्म सबमिट करू शकता इथे शिक्षकांनी लक्षात ठेवावे नुसता फॉर्म सेव करून चालणार नाही तर तो सबमिट करावा लागेल नाहीतर तुमचा पसंतीक्रम ग्राह्य धरला जाणार नाही ओटीपी प्रवेश करून अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे हा अर्ज तुम्ही पुन्हा म्हणजेच मागेही घेऊ शकता करण्यासाठी पुन्हा एकदा डिस्ट्रिक्ट वर क्लिक करावे आपलिकेशन फॉर्मवर क्लिक केले असता स्क्रीनवर डिफिकल्ट एरिया एप्लीकेशन वर क्लिक केले की तुम्ही भरलेल्या पसंती क्रमाचा अर्ज तुम्हाला स्क्रीनवर दिसेल त्याखाली म्हणजे विकल्प मागे घ्या हे बटन दिसेल त्यावर क्लिक केले असता ओटीपी प्रविष्ट करून तुम्ही तुमचे विकल्प मागे घेऊ शकता व मुदत असेपर्यंत अर्ज पुन्हा भरू शकता अर्ज भरायची मुदत असेपर्यंत पोर्टलवर अर्ज कितीही वेळा भरून ते विट्रो करू शकता परंतु एकदा का तारीख उलटली की नंतर तुम्ही पोर्टलवर सबमिट करावा त्यानंतर पोर्टलवर बदली प्रक्रिया राबवली जाईल व बदलीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून निर्गमित केले जातील 2022 च्या बदलीचे सर्व टप्पे पूर्ण होतील.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: