शुक्रवार, १७ मार्च, २०२३

या संघटनेच्या संपात सहभागी न होणाऱ्या पदाधिकारींवर शिस्तभंगाची कारवाई होणार

 ✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻
*लढेंगे जितेंगे..!!*

*शिक्षणाच्या हक्कासाठी!!*

*शिक्षकांच्या सन्मानासाठी!!*

🙏🏻📜✍🏻

*संघर्ष नको...परंतु सर्व पाहिजे*

    आम्ही सरकारी, निम-सरकारी शिक्षक, कर्मचारी असल्यामुळे आम्हाला आमचे सर्व सेवा विषयक लाभ, सर्व आवश्यक सुविधा मिळायलाच पाहिजे. नव्हे तो आमचा हक्क आहे.  ते हक्क मिळत नसेल तर संघटनांनी आमच्यासाठी संघर्ष केलाच पाहिजे, आंदोलने केलीच पाहिजे, संप केलाच पाहिजे... 

   मी मात्र संघर्षात उतरणार नाही. आंदोलन पुकारणाऱ्या नेतृत्वावर कारवाई झाली तरी चालेल. परंतु संपात उतरल्यावर मला मात्र धक्काही लागायला नको. 

    स्वराज्यासाठी- राष्ट्र उभारणीसाठी छत्रपती शिवराय पाहिजेत, राष्ट्रपिता महात्मा गांधी पाहिजेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाहिजेत. प्राग-परंपरा, वाईट रुढी दूर सारून सामाजिक न्यायासाठी महात्मा फुले, सावित्रीब्आई फुले, राजर्षी शाहू महाराज पाहिजेत. त्या-त्या काळात अत्यंत कठीण परिस्थितीत संकटाला तोंड देत या  लोकांनी आपले कार्य पार पाडले. त्यामुळेच ते महान झाले. हे सर्व आपण विद्यार्थ्यांना शिकवतो. परंतु आपण कितपत कृतीत आणतो याचा विचार करणे गरजेचे आहे. 

   आमच्या मागण्यासाठी संप केला पाहिजे, आंदोलन का करत नाही. संघटना मूग गिळून बसल्या का. सरकारला विकल्या का असे म्हणणारे आम्ही..! संघटनांनी एकत्र येऊन संप पुकारल्यानंतर- शासनाच्या धमक्यांना घाबरून, सोशल मीडियावरून दीड दमडीच्या लोकांकडून टीका होत होत असल्याने शाळेत, कार्यालयात संप सोडून पळून जाण्याची एखाद-दुसरी घटना चर्चेत येत आहे ही शोकांतिका आहे.

श्री संतोष ताठे राज्य संपर्कप्रमुख शिक्षकभारती (प्रा)   परंतु अनेक ठिकाणी १००% कर्मचारी, शिक्षक संपात आहेत ही सकारात्मकता लक्षात घेत नाही ही शोकांतिका आहे.

   मला जुनी पेन्शन पाहिजे. मला वेतन त्रुटी दुरुस्त करून पाहिजे. मला माझी वैयक्तिक सोय होईल असेच बदली धोरण पाहिजे. विषय पदवीधराची वेतनश्रेणी पाहिजे. मुख्यालय राहण्यातून सूट पाहिजे. आदर्श शिक्षकाची वेतनश्रेणी पाहिजे. १०, २०, ३० वर्षाची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पाहिजे. उच्च शैक्षणिक अर्हता असल्याने वरचे पद पाहिजे. अप्रशिक्षित शिक्षण सेवक म्हणून लागलेली माझी सेवा सर्व लाभासाठी मान्य केली पाहिजे. वस्ती शाळा स्वयंसेवक म्हणून पहिल्या दिवसापासून ची माझी सेवा सर्व गोष्टीसाठी मान्य केली पाहिजे. मला वार्षिक वेतन वाढ पाहिजे. नियमित महागाई भत्ता वेळेवर मिळाला पाहिजे. वाढीव रजा, विशेष सुट्ट्या, बाल संगोपन रजा पाहिजेत. पितृत्व रजा सुद्धा पाहिजे. अपंगत्वाचे सर्व फायदे मिळाले पाहिजे. नियमितपणे वेतन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्या पाहिजेत.       सरकारद्वारे राबवले जाणारे उपद्रवी उपक्रम मला नकोत. अशैक्षणिक कामे नकोत. 

      हे सर्व मिळण्यासाठी मला संघटनेची गरज आहे. संघटनेने माझे प्रश्न घेऊन लढले पाहिजे. संघर्ष केला पाहिजे. 

   *_मी मात्र संघटनेच्या आव्हानाला प्रतिसाद न देता संपावर येणार नाही, संपात सहभागी झाल्यावर पळपुटेपणा दाखवून कर्तव्यावर रुजू होण्याचा विचार करतो, घरीच राहतो. केवळ समाज माध्यमावरच व्यक्त होऊन आपली शूरता दाखवतो._*

   अशा प्रकारची नकारात्मक भूमिका, घाबरटपणा हा केवळ चळवळीशी विश्वासघात नसून- यातून आपणच सुरक्षित भविष्याचा विचार न करता आपल्या पायावर धोंडा मारून घेत आहोत. आपला आत्मघात करणार आहोत.

    सन्मा. अपवाद वगळता काही प्रसार माध्यमे, कवडीची सामाजिक किंमत नसलेले आयटी सेलचे चे अर्धसाक्षर, संपविरोधी भूमिका घेऊन सरकारकडून काही लाभ मिळतात का याची आस लावून बसलेले तथाकथित समाजसेवक- हे सर्व आज आम्हा कर्मचारी, शिक्षकांच्या विरोधात गरळ ओकत आहे.

   मात्र आपल्याला संघर्ष कायम ठेवून, उद्याचा विचार करून संपात आपलाही सहभाग कायम ठेवायचा आहे. 

    १९७८ च्या ५४ दिवसाच्या संपातून मिळवलेले कुटुंब निवृत्ती वेतन, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वेतनवाढी हे सर्व बंद करण्याचा कुविचार (आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक आणि कॉर्पोरेट घराण्याच्या दबावातून) होत असताना, कामगार कायदे बदलवून आमची सुरक्षितता धोक्यात आली असताना- *आपण संघर्षापासून दूर कसे राहू शकतो..?* 

   चळवळीतील प्रत्येकाला विनंती आहे की, आपल्या सहकारी बंधू-भगिनींना हे भयावह वास्तव समजावून सांगा. या आंदोलनातील त्यांचा सहभाग कायम राहण्यासाठी त्यांना प्रेरणा द्या. जे अजूनही संपात नाही त्यांना त्यांचे व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या वारसदारांचे भविष्य अंधारात जाण्याची स्थिती व धोरण समजावून सांगा. 

    *शिक्षक भारती* च्या सर्व राज्य,विभाग,जिल्हा, तालुका पदाधिकाऱ्यांना विनंती करण्यात येते की, कुठे नकारात्मक भावना न ठेवता संप यशस्वी झालाच पाहिजे या दृष्टीने आपण सर्वांनी काम केले पाहिजे.

     _*शिक्षक भारती चे जे राज्य, विभाग, जिल्हा, तालुका स्तरावरील पदाधिकारी प्रत्यक्ष संपात सहभागी नसतील तर अशांच्या नकारात्मक भूमिकेची माहिती घेऊन त्यांच्यावर संघटनात्मक शिस्तभंगाची कारवाई करून पदमुक्त करण्याचाही निर्णय घेतला जाईल.*_

    *शिक्षक भारती* चे *_जे पदाधिकारी स्वतः संपात सहभागी होणार नाहीत किंवा राज्य शाखेकडून सूचना येण्यापूर्वी (अर्थात संप मागे घेण्यापूर्वी) संपातून माघार घेतील अशा कोणत्याही पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला भविष्यात तालुका, जिल्हा, विभाग, राज्यस्तरावर कोणतेही पद दिले जाणार नाही._*

   *शिक्षक भारती* च्या *_कोणत्याही तालुका जिल्हा विभाग शाखेला संप  परस्पर मागे घेण्याचा असा नकारात्मक कोणताही निर्णय घेता येणार नाही._* 

   ज्या तालुका, जिल्हा, विभाग शाखा संपविरोधी भूमिका घेतील त्या शाखांच्या नकारात्मक भूमिकेचा गांभीर्याने विचार करून शाखा बरखास्तीचा निर्णय घेतला जाईल.

कळावे...!!

आपण सर्व उपरोक्त बाबीचा विचार करून चं योग्य निर्णय घ्याल या अपेक्षे सह...!


*लढेंगे जितेंगे..!!*

*शिक्षणाच्या हक्कासाठी!!*

*शिक्षकांच्या सन्मानासाठी!!*

        आपला 

   *संतोष ताठे* 

राज्य संपर्कप्रमुख शिक्षकभारती (प्रा)

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा