प्री-प्रायमरी, केजी अन् नर्सरी सुरू करण्यापूर्वीदेखील आता घ्यावी लागणार शिक्षण विभागाची परवानगी....
गल्लीबोळातील प्ले स्कूल, प्री-प्रायमरी, केजी, नर्सरी शाळांवर आतापर्यंत कुणाचेही नियंत्रण नव्हते. मात्र, आता यापुढे अशा शाळा मनमानी पद्धतीने चालवता येणार नाहीत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्ले स्कूल या शाळा सुरू करताना शिक्षण विभागाची परवानगी घ्यावी लागणार असून या सर्व शाळांवर शिक्षण विभागाचे नियंत्रण राहणार आहे. निपुण वर्ग, शाळा, क्षमता याअंतर्गत नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे राबवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा