डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

सेवानिवृत्त शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू

 

जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ८५८ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. यात प्राथमिक शिक्षकांसह पदवीधर शिक्षकांचा समावेश आहे. या रिक्त जागांवर सेवानिवृत्त शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू झाली असून जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १०१ शिक्षकांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून अंतिम निर्णय या आठवड्यात होणार आहे.

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात आला होता. या निर्णयाला शिक्षक संघटनाकडून विरोधही झाला.
मात्र, शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद शाळा व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त शिक्षकांमधून वीस हजार रुपये मानधनावर कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपाची सेवानिवृत्त शिक्षक भरती करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सुरू केली आहे. जिल्ह्यात ८५८ शिक्षकांचे पदे रिक्त आहेत. त्यानुसारही कंत्राटी भरती सुरू झाली आहे.


पहिल्या टप्प्यात १८७ सेवानिवृत्त शिक्षकांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यांपैकी कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी १२७ सेवानिवृत्त शिक्षकांना बोलविण्यात आले होते. त्यांपैकी १०४ सेवानिवृत्त शिक्षक कागदपत्र पडताळणीला उपस्थित राहिले. यात १०१ शिक्षकांची निवड शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे.