डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

स्टार्स प्रकल्प अंतर्गत संकलित चाचणी पेपरचा तुटवडा

 संकलित चाचणीसाठी प्रश्नपत्रिका कमी...

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेतर्फे 'स्टार्स' प्रकल्पांतर्गत ३ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन संपादणूक चाचणी राज्यात प्रश्नपत्रिका कमी आहेत. आता या अपूर्ण प्रश्नपत्रिकांवर विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घ्यावी? असा प्रश्न शिक्षकांसह शिक्षणाधिकाऱ्यांनाही पडला आहे.



ऑक्टोबर अखेर इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, इंग्रजी आणि गणित या विषयांची संकलित मूल्यमापन परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पुरवल्या जात आहेत. मात्र त्या प्रश्नपत्रिका विद्यार्थी संख्येनुसार शाळांपर्यंत पोहोचल्याच नाहीत. त्यामुळे शाळांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

संकलित मूल्यमापन चाचणी एकसाठी राज्यस्तरावरून मराठी गणित आणि इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिका वाटप करण्यात आल्या. यात शाळांच्या पटसंख्येनुसार प्रश्नपत्रिका मिळणे अपेक्षित असताना प्रत्येक शाळेला त्या कमी संख्येने देण्यात आल्या. अनेक शाळांना तर चौथीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकाच मिळाल्या नाहीत. 

एक प्रश्नपत्रिका आठ पानांची आहे. त्याची एक झेरॉक्स प्रत काढण्यासाठी कमीत कमी १६ रुपये खर्च येणार आहे, शाळांना खर्चासाठी अनुदान  नाही, मग झेरॉक्सचा खर्च कसा करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: