आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ४ % ने महागाई
भत्ता वाढणार ?
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्याच्या तयारीत आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ४ टक्के वाढ da hike करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. बुधवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांना महागाई भत्ता ४२ टक्के झालेला आहे. आता राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेण्याची तयारी केल्याचं दिसतंय. त्यामुळे त्यांच्या महागाई भत्त्यात आणखी चार टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे. यामुळे त्यांचा महागाई भत्ता आता ४६ टक्के होईल.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा