घर,सदनिका किंवा दुकान खरेदी करतानाच वीजजोडणी स्वतःच्या नावावर(meter transfer) करून घेण्याची सोय खरेदीदारांना 'महावितरण' कडून उपलब्ध झाली आहे.
त्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाची संगणक प्रणाली 'महावितरण'शी जोडण्यात आली असून, जुनी मालमत्ता घेताना दस्तनोंदणीपूर्वी पब्लिक डेटा एन्ट्री करताना वीजबिलाच्या नावात बदल करण्याचा पर्याय निवडल्यास 'इज ऑफ लिव्हिंग'नुसार पुढील प्रक्रिया 'महावितरण'कडून स्वयंचलित पद्धतीने करण्यात येत आहे.
महावितरण' आणि नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संयुक्त सहकार्यातून वीजबिलात नावात बदल करण्याची स्वयंचलित प्रक्रिया सुरू केली आहे.
यापूर्वी वीजजोडणी किंवा बिलावरील नाव बदलण्यासाठी ऑनलाइन अर्ज करताना ओळखपत्र, इंडेक्स दोन व इतर कागदपत्रे अपलोड करण्याची स्वतंत्र प्रक्रिया करावी लागत होती; पण आता दस्तनोंदणीच्या वेळीच वीजबिल नावावर करून
घेण्याची सोय उपलब्ध झाली आहे.
दस्तावेज अपलोडची आता गरज राहणार नाही....
एकाच नावाने मालमत्तेची खरेदी झाली असल्यास अर्जदाराने कोणतेही दस्तावेज अपलोड करण्याची गरज राहणार नाही.
एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे खरेदी असल्यास ज्या व्यक्तीच्या नावे वीजजोडणी करायची, त्यासाठीची संमती व ना हरकत प्रमाणपत्र मागविण्यात येईल.
याबाबत संबंधित नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर 'महावितरण'कडून 'एसएमएस'द्वारे संदेश व वेबलिंक पाठविली जात आहे.
तथापि, 'एसएमएस' पाठविल्यावर ६० दिवसांच्या आत प्रक्रिया शुल्काचा भरणा केला नाही किंवा आवश्यकतेनुसार ना हरकत प्रमाणपत्र वेबलिंकद्वारे अपलोड केले नाही, तर नावात बदल करण्याची प्रक्रिया आपोआप रद्द होईल. वीजजोडणीच्या नावात बदल करण्यासाठी ग्राहकांनी सध्याच्या पद्धतीनुसार स्वतंत्रपणे कार्यवाही करावी.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा