आॕनलाईन सुविधा नसतानाही पगार कापन्याची वेळ शिक्षकांवर का आली online work ?
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना दरवेळी आता पगार कपात करण्याचे आदेश निघत आहेत. वास्तविक युडायस कामासाठी जबाबदार धरून एम.पी.एस. सी कडून पगार थांबविण्याच्या सुचना येताय हे तर फारच विदारक स्वरूप प्रशासकीय कामाचे म्हणावे लागणार.
ज्याप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी सज्जा यांना डाटा आॕपरेटरसह , संगणक , व्हायफाय सुविधासह इंटरनेट देण्यात आले तसली कोणतीही सुविधा नसतांना सतत शिक्षकांना आॕनलाईन कामांना जोतल्या जात आहे हे कितपत योग्य ?
दिवाळी सुट्टीपुर्वी आॕनलाईन कामाच्या ताणतणावाने एका मुख्याध्यापकाच्या मृत्यूची बातमी वाचण्यात आली त्यास ही जबाबदार नेमकी कोणती यंत्रणा म्हणावी लागेल.
२१ व्या शतकातील शिक्षक काय केवळ तंत्रस्नेही बनवून मिरवायचा हे ही शिक्षणास घातक ठरत आहे. आजघडीला केंद्रप्रमुख लाॕगीन, पगाराचे काम यासाठी ही शिक्षकांना आपला वेळ खर्ची करून हे काम ओढावे लागत आहे.
दरवेळा शिक्षक पगारातूनच या कामाचा बोझा उचलत आहे. तरीही पगार थांबविण्याची शिक्षा आणण्याची प्रशासन कारवाई का ? करत आहे .
आपणांस काय वाटते काॕंमेट करा....
conclusion - हे मत संपूर्ण त्रस्त शिक्षक बांधवाचे असून शासनाने आॕनलाईन कामाचा online worksबोझा कमी करावा हीच माफक अपेक्षा .
faq -
१) अजूनही सर्व शाळेत विज पुरवठा आहे का ?
२) पाण्याची सुविधा ही प्रत्येक शाळेत आहे का?
३) इंटरनेटसह संगणक प्रणाली उपलब्ध आहेत का?
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा