डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शालेय परिपाठ दिवस 134 वा

 चला सोपा करूया परिपाठ

Good Thought


*दिवस 134 वा*

*संकल्पना व लेखिका*

*सौ रोहिणी पिंपरखेडकर-विद्यासागर*

मोबाईल नंबर 9130958046

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

तारीख -

२३ डिसेंबर २०२३

वार:-शनिवार

तिथी:-मार्गशीर्ष शु ११ शके १९४५

 शिवराज शक 350

अयन-उत्तरायण

ऋतू - हेमंत ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलाखर "



Today's almanac

 Date - 23 December 2023

         Saturday

 Tithi-Margshirsh Shu 11 shak 1945

 Ayana-Uttrayana

 Season:-pre-winter season


"Jamadilakhar"  month of Muslims 


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

 शनिवार, 23 डिसेंबर 2023

सूर्योदय 07:08, 

खगोलीय दुपार: 12:37, 

सूर्यास्त: 18:07, 

दिवस कालावधी: 10:59, 

रात्र कालावधी: 13:01.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सुविचार

जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी गोष्ट म्हणजे माणुसकी.

good thought

 The only great thing in the world that cannot be measured in any scale is humanity.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚


दिनविशेष

२००४: भारताचे ९ वे पंतप्रधान, वाणिज्य व उद्योगमंत्री नरसिंह राव यांचे निधन. (जन्म: २८ जून १९२१)


Day special

2004: Death of Narasimha Rao, 9th Prime Minister of India, Minister of Commerce and Industry.  (Born: 28 June 1921)

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

म्हणी/proverb

cowards may die many times before there death -भित्यापाठी ब्रह्मराक्षस

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

कोडे

मी खात पित नाही आणि पगार पण घेत नाही तरी सुद्धा तुमच्या घराला पहारा देतो, सांगा बर मी कोण?


⇒ उत्तर: कुलूप


I don't eat or drink and I don't get salary but I guard your house, tell me who am I?


 ⇒ Answer: Lock

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

सामान्य ज्ञान

०१) कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो ?

- ऑस्ट्रेलिया.


०२) लाल किल्ला कोणत्या शहरात आहे ?

- दिल्ली.


०३) "गुलाबी शहर" म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे ?

- जयपूर.


०४) भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात ?

 - २६ जानेवारी.


०५) भारताच्या दक्षिणेस असलेला महासागर कोणता आहे ?

- हिंदी महासागर.


General knowledge

 01) Kangaroo is found in which country?

 - Australia.


 02) Red Fort is located in which city?

 - Delhi.


 03) Which city is known as "Pink City"?

 - Jaipur.


 04) Which day is celebrated as Republic Day in India?

  - 26 January.


 05) Which is the ocean south of India?

 - Indian Ocean.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

बोधकथा

एका पेन्सिलीची गोष्ट

  राज अस्वस्थ होता कारण त्याने इंग्रजीच्या परीक्षेत खराब कामगिरी केली होती. त्याची आजी त्याच्याजवळ आली आणि तिने त्याला एक पेन्सिल दिली. विचारात पडलेल्या राज ने आजी कडे पहिले आणि म्हणाला "माझ्या परीक्षेतील खराब कामगिरी नंतर मी पेन्सिल घेण्यास पात्र नाही." आजीने समजावले," तू ह्या पेन्सिल कडून खूप चांगल्या गोष्टी शिकू शकतोस, कारण ती तुझ्यासारखीच आहे, ती पण धार लावून घेण्याचा वेदनादायी अनुभव घेते, अगदी तसाच जसा तू तुझा परीक्षेत खराब कामगिरी केल्याचा घेतला आहेस! तरीही ती तुला चांगला विद्यार्थी घडवण्यास मदत करणार आहे. ज्याप्रमाणे हे पेन्सिल च्या आतून येते त्याप्रमाणे तुलाही अडथळ्यांना पार करण्याचा बळ तुझ्यातच सापडेल. आणि शेवटी ज्याप्रमाणे पेन्सिल कुठलीही पृष्ठभागावर आपला ठसा उमटवते, त्याचप्रमाणे तुही जे काही करायला घेशील त्यावर तुझा ठसा राहील.” राजला लगेच बरं वाटलं आणि त्याने स्वतःला वचन दिले की तो इथून पुढे चांगली कामगिरी करेल. तात्पर्य: आपल्या सगळ्यांमध्ये आपल्याला हवं ते बनण्याची क्षमता असते.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

श्लोक

काव्य-शास्त्र-विनोदेन कालो गच्छति धीमताम्।

व्यसनेन तु मूर्खाणां निद्रया कलहेन वा॥

:-जे विद्वान असतात ते काव्य,शास्त्र इत्यादी विषयावर चर्चा करण्यासाठी वेळ देतात तर मूर्ख लोक हाच वेळ व्यसने,झोप काढणे आणि वादविवाद करणे यात घालवतात.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚