डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शालेय परिपाठ दिवस 139

 *चला सोपा करूया परिपाठ*


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

तारीख -३० डिसेंबर २०२३

वार:-शनिवार

तिथी:-मार्गशीर्ष कृ ४ शके १९४५

 शिवराज शक 350

अयन-उत्तरायण

ऋतू - हेमंत ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलाखर "



Today's almanac

 Date - 30 December 2023

         Saturday

 Tithi-Margshirsh krushna 4 shak 1945

 Ayana-Uttrayana

 Season:-pre-winter season


"Jamadilakhar"  month of Muslims 


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

 शनिवार, 30 डिसेंबर 2023

सूर्योदय 07:06, 

खगोलीय दुपार: 12:37, 

सूर्यास्त: 18:08, 

दिवस कालावधी: 11:02, 

रात्र कालावधी: 12:58.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

*सुविचार* 

*जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.*

Good Thought

“Learning is never done without errors and defeat.” – Vladimir Lenin

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

*दिनविशेष*

१)१९२४: एडविन हबलने आकाशगंगे खेरीज इतर दीर्घिकाही अस्तित्त्वात असल्याचे जाहीर केले.


२)१९४३: सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला.


३)१९३४: हबल स्पेस टेलिस्कोप चे सहनिर्माते जॉन एन. बाहॅकल यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑगस्ट २००५)


४)१९५०: सी + + प्रोग्रामिंग भाषाचे जनक बर्जनी स्ट्रास्ट्रुप यांचा जन्म.


*Day Special*

 1)1924: Edwin Hubble announced the existence of galaxies other than the Milky Way.


 2)1943: Subhash Chandra Bose unfurled the Indian independence flag at Port Blair.


 3) 1934: Hubble Space Telescope co-creator John N.  Birth of Bahakal.  (Death: 17 August 2005)


 4) 1950: Birth of Björn Strastrup, father of C++ programming language.


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

*आजची म्हण व अर्थ*

आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार ?- स्वतःजवळ नाहीतर तो दुसऱ्यास काय देणार ?

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

*आजचे कोडे*

छगन आणि मगन हे दोघे मित्र आहेत

छगनच्या कोंबडीने मगनच्या घरी जाऊन अंडी दिली,

तर मग अंडी कोणाची छगनची कि मगनची?


⇒ उत्तर: अंडी तर कोंबडीचीच राहणार ना.



दोन अक्षरांचे माझे नाव, डोकं झाकणे माझं काम?

ओळखा पाहू मी कोण?


=> टोपी

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

*बोधकथा*


फासेपारधी व पक्षी

एका पारध्याने शेतात पक्षी धरण्यासाठी आपले जाळे पसरून ठेवले व तो एका झाडाआड लपून जाळ्यात पक्षी कसे काय सापडतात ते पहात बसला. काही वेळाने एकामागून एक पक्षी त्या ठिकाणी येऊ लागले. ते थोडा वेळ तेथे बसत आणि उडून जात. याप्रमाणे थोडे थोडे पक्षी तेथे दिवसभर येत होते. पण ते अगदी थोडे असल्यामुळे त्यांना पकडावे असे त्या पारध्याला वाटले नाही. खूप पक्षी एकदम पकडावे असे त्याच्या मनात होते. शेवटी संध्याकाळ झाली व सगळे पक्षी आपापल्या घरट्यात निघून गेले. मग निराश होऊन त्या पारध्याने जाळे काढून घेतले व नशिबाला दोष देत तो घरी गेला.


तात्पर्य


- कोणत्याही कामात उतावीळपणा जसा चांगला नाही त्याप्रमाणे दिरंगाईही योग्य नाही.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

*सामान्य ज्ञान प्रश्न*


1)भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो?

उत्तर : अरुणाचल प्रदेश


2) इन्सुलिन चा उपयोग कोणत्या आजाराच्या उपचारासाठी केला जातो?

उत्तर : मधुमेह


3) बिहू हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे?

उत्तर : आसाम


4) कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला?

उत्तर : चीन


5) गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव काय होते?

उत्तर : सिद्धार्थ


*General Knowledge Questions*


 1) In which state does the sun rise first in India?

 Answer: Arunachal Pradesh


 2) Insulin is used to treat which disease?

 Answer: Diabetes


 3) Bihu is a famous festival of which state?

 Answer: Assam


 4) Which country invented paper?

 Answer: China


 5) What was the childhood name of Gautama Buddha?

 Answer: Siddharth


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

श्लोक

यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा, शास्त्रं तस्य करोति किं।

लोचनाभ्याम विहीनस्य, दर्पण: किं करिष्यति।।

अर्थ:-ज्या माणसाला स्वतःची सद्सद्विवेकबुद्धी, जाणीव आणि समज नाही, त्याला शास्त्र काय करू शकेल?  जसे की डोळे नसलेल्या माणसासाठी आरसा काय करू शकतो?

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: