जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत मा. प्रधान सचिव (ग्रामविकास) यांच्या अध्यक्षतेखाली दि.०४.१२.२०२३ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये देण्यात आलेल्या निर्देशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व जिल्हा परिषद यांना पुढीलप्रमाणे सुचना देण्यात आलेल्या आहे.
१. प्रत्येक जिल्ह्याला २ फाइल्स अद्ययावत करून पाठवायच्या आहेत. सदर फाईल्स व्हिन्सीस कंपनीकडून आपणास ईमेल वर पाठवलेल्या असून त्या अद्ययावत करून पाठवाव्या.
२. पहिल्या फाइल मध्ये जे शिक्षक २०१९ मध्ये रुजू झाले आहेत, अशा शिक्षकांची माहिती अद्ययावत करायची आहे.
३. दुसऱ्या फाइल मध्ये २०२२ मध्ये बदली झालेल्या सर्व शिक्षकांची माहिती असेल. त्या फाइलमध्ये २ कॉलम अद्ययावत करायचे आहेत.
(अ) Is Relieved - येथे yes किंवा no हे पर्याय भरायचे आहे. जर बदली शिक्षकाला त्या जिल्ह्यातून मुक्त केले असेल तर yes निवडा नाहीतर no निवडा.
(आ) Status - येथे ड्रॉपडाउन मध्ये ४ पर्याय दिले आहेत.
१. Relieved -जिल्ह्यातून मुक्त केले असेल तर निवडा.
२. Non relieved - जिल्ह्यातून मुक्त केले नसेल. संकलन-सतीश कोळी, शिक्षक समिती MSP
३. Rejected - शिक्षकाने बदली नाकारली असेल तर.
४. Court case - एखाद्या शिक्षकावर court case चालू असेल.
४. ईमेल मध्ये एक टेबल दिले आहे. त्यात प्रत्येक जिल्ह्याने बिंदुनामावली मध्ये खुल्या वर्गातील (एकूण) रिक्त पदांची जी संख्या भरली आहे ती टेबल मध्ये नमूद करावी त्यातील खुल्या वर्गातील संख्या व EWS संवर्गातील संख्या वेगवेगळ्या नमूद कराव्यात.
वरीलप्रमाणे माहिती व्हिन्सीस कंपनीस तात्काळ उपलब्ध करुन देण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा