चला सोपा करूया परिपाठ
*दिवस 135 वा*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आजचे पंचांग
तारीख -
२६ डिसेंबर २०२३
वार:-मंगळवार
तिथी:-मार्गशीर्ष शु १५ शके १९४५
शिवराज शक 350
अयन-उत्तरायण
ऋतू - हेमंत ऋतू
मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलाखर "
Today's almanac
Date - 26 December 2023
Tuesday
Tithi-Margshirsh Shu 15 shak 1945
Ayana-Uttrayana
Season:-pre-winter season
"Jamadilakhar" month of Muslims
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
मंगळवार, 26 डिसेंबर 2023
सूर्योदय 07:05,
खगोलीय दुपार: 12:35,
सूर्यास्त: 18:05,
दिवस कालावधी: 11:00,
रात्र कालावधी: 13:00.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सुविचार
समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी,
समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.
Good thought
No matter how great the storm at sea,
The sea never leaves its calm.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
*दिनविशेष*
1.१८९८: मेरी क्यूरी आणि पिअर क्यूरी यांनी प्रथमच रेडिअम हे मूलद्रव्य वेगळे केले.
2 वीर बाल दिवस
*Day Special*
1.1898: Marie Curie and Pierre Curie first isolated the element radium.
2 Veer Bal Diwas
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
*आजची म्हण व अर्थ*
आजा मेला नि नातू झाला:
एकीकडे फायदा तर दुसरीकडे तोटा होणार.
*आजचे कोडे*
कोणता तो चेहरा…
सकाळपासून संध्याकाळ पर्यंत..
आकाशाकडे पाहत राहतो हसत…
उत्तर :- सूर्यफूल
*Today's Riddle*
What is that face?
From morning to evening..
Keeps smiling at the sky...
Answer :- Sunflower
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
*बोधकथा*
*श्रीमंत व्यापारी*
एका मोठ्या शहरात एक श्रीमंत व्यक्ती राहत होता. त्यांच्याकडे भरपूर पैसा होता आणि नुकतेच त्याने शहरात एक मोठे घर घेतले होते. त्याच्याकडे धनसंपत्ती तर भरपूर होती. परंतु शरीराने तो अतिशय दुबळा व अस्वस्थ होता.
तो दिवस-रात्र मेहनत करून पैसे कमावित असे. परंतु आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला त्याच्याकडे वेळ नव्हता. हळू हळू तो खूप श्रीमंत झाला परंतु त्याला आहेत रोगांनी विळखा घातला.
तो व्यक्ती स्वार्थी नव्हता, परंतु त्याच्याकडे आपला पैसा खर्च करण्यासाठी वेळ नव्हता त्याला जणू पैसे कमावण्याची सवयच लागली होती. त्याला डॉक्टराकडे जाण्याची वेळच मिळत नसे. शरीराकडे लक्ष न दिल्याने हळूहळू त्याचे शरीर कमजोर व्हायला लागले.
एक दिवस कामावरून थकून तो घरी आला. आज त्याचे डोके खूप दुखत होते, म्हणून तो सरळ आपल्या रूम मध्ये जावून झोपून गेला. जेव्हा त्याच्या नौकराने त्याला जेवायला विचारले तेव्हा भूक नाही म्हणून, त्याने जेवायला नाही म्हटले.
अर्ध्या रात्री त्याचे डोक्यात अतिशय वेदना व्ह्यायाला लागल्या. त्याला काहीही लक्षात येत नव्हते. अचानक त्याच्या समोर त्याच्याच आकाराएवढी एक आकृती उभी राहिली. ती आकृती म्हणाली, "मी तुझी आत्मा आहे आणि आज मी तुझे शरीर सोडून जाणार आहे."
तेव्हा तो माणूस भित भित म्हणाला, "तू माझ्या शरीराला का सोडत आहे? माझ्याकडे भरपूर पैसा आहे व मी माझे संपूर्ण आयुष्य मेहनत केली आहे. मी एवढ्या विशाल घरात राहतो, की या घरात राहण्याची आणि अनेक जण फक्त स्वप्नेच पाहतात.
आत्मा म्हणाली, "माझी गोष्ट ऐक, तुझे हे मोठे घर माझ्या काहीही कामाचे नाही. माझे घर तर तुझे शरीर आहे. जे दिवसेंदिवस कमजोर होऊन, अनेक रोगांनी ग्रसित झाले आहे."
"तू कल्पना कर अनेक वर्षे तुटलेल्या झोपडीत राहण्याची. बस त्याच पद्धतीने तू माझी हालत केली आहे. आणि आता मी या घरात अधिक काळ राहू शकत नाही." एवढे बोलून आत्मा त्या शरीराला सोडून निघून गेली.
तात्पर्य: शरीर व चांगले स्वास्थ ही सर्वात मोठी संपत्ती आहे.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
सामान्य ज्ञान
०१) किसन बाबुराव हजारे यांचे टोपण नावा कोणते आहे ?
- अण्णा हजारे.
०२) 'कोण बनेगा करोडपती 'या प्रसिद्ध टीव्ही सिरीयल चा अँकर कोण आहे ?
- सुपरस्टार अमिताभ बच्चन.
०३) भारताचे पहिले प्रधानमंत्री कोण होते ?
- जवाहरलाल नेहरू
०४) भारतीय राष्ट्रीय ध्वजात किती रंगाचे पट्टे आहे ?
- तीन.
०५) चादरीकरीता ष्रसिद्ध ठिकाण कोणते आहे ?
- सोलापूर.
general knowledge
01) What is the nickname of Kisan Baburao Hazare?
- Anna Hazare.
02) Who is the anchor of the famous TV serial 'Kon Banega Crorepati'?
- Superstar Amitabh Bachchan.
03) Who was the first Prime Minister of India?
- Jawaharlal Nehru
04) How many color stripes are there in Indian national flag?
- Three.
05) Which is the famous place for Chadar?
- Solapur.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
श्लोक
काक चेष्टा, बको ध्यानं, स्वान निद्रा तथैव च।
अल्पहारी, गृहत्यागी, विद्यार्थी पंच लक्षणं।।
अर्थ
शिकण्यासाठी कटिबद्ध असलेल्या विद्यार्थ्यामध्ये ही पाच वैशिष्ट्ये असली पाहिजेत - कावळ्यासारखे सगळीकडे लक्ष असणे, बगळासारखे ध्यान करणे, कुत्र्यासारखे सावध झोपणे, आळस येणार नाही असे अल्प खाणे आणि शिकण्यासाठी घर सोडण्याची तयारी
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.