चला सोपा करूया परिपाठ
दिवस 124 वा
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आजचे पंचांग
तारीख -
१२ डिसेंबर २०२३
वार:मंगळवार
तिथी:-कार्तिक कृ १५ शके १९४५
शिवराज शक 350
अयन-दक्षिणायण
ऋतू - शरद ऋतू
मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलावल "
Today's almanac
Date - 12 December 2023
Tuesday
Tithi-kartik kru 15 shak 1945
Ayana-Dakshinayana
Season:-Autumn season
"Jamadilawal" month of Muslims
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
मंगळवार, 12 डिसेंबर 2023
सूर्योदय 07:02,
खगोलीय दुपार: 12:32,
सूर्यास्त: 18:02,
दिवस कालावधी: 11:00,
रात्र कालावधी: 13:00.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सुविचार
सुविचार
व्यक्तिमत्व असे घडवा की कोणीही आपल्यामागे वाईट बोलले तरी ऐकणाऱ्याला ते खोटं वाटलं पाहिजे.
Good Thought
Develop a personality such that even if someone speaks ill of you behind your back, the listener should think it is a lie.
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
दिनविशेष
१९११: दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती.
२००१: पृथ्वी या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली.
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
आजची म्हण व अर्थ
कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही - क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही.
Today's proverb and meaning
A cow does not die by the curse of a crow - the slander of a mean man does not harm the noble.
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
कोडे
रात्री जागतो, दिवसा झोपतो, नेहमी झाडाला उलट लटकलेला असतो, ओळखा पाहू मी कोण?
उत्तर : वटवाघूळ
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
सामान्य ज्ञान
1)महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला?
उत्तर : 2 ऑक्टोबर 1869
2) काझीरंगा राष्ट्रीय पार्क कोठे आहे?
उत्तर : आसाम
3) गायत्री मंत्र कोणत्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे?
उत्तर : ऋग्वेद
4) राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : 28 फेब्रुवारी
5) राष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : 12 जानेवारी
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
बोधकथा
एकदा एक गरुड पक्षी एका सशाच्या मागावर टपून बसला होता. तिथे जवळच झाडावर एक चिमणी बसली होती. ती सशाला म्हणाली, 'अरे, तू किती मूर्ख आहेस ? तू एवढा चपळ असताना घाबरतोस का ? तू जर प्रयत्न करशील तर या गरुडाच्या हातून तू सहज सुटशील. चल ऊठ, पळ !' असं ती बोलत होती. इतक्यात एका ससाण्याने झडप टाकून तिला पकडले. तेव्हा ती केविलवाणे ओरडू लागली. ते पाहून ससा तिला म्हणाला, 'स्वतः एवढा धीटपणाचा आव आणून तू मला हिणवत होतीस, आता तू आपला जीव कसा वाचवतेस ते पाहू !'
तात्पर्य
- दुसर्याला शहाणपण शिकवणारे लोक स्वतः संकटात पडले की त्यांचे शहाणपण निरुपयोगी ठरते.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
श्लोक
ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।।
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.