डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

डिजिटल परिपाठ दिवस १२१ वा

 चला सोपा करूया परिपाठ

परिपाठ

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

तारीख -

८ डिसेंबर २०२३

वार:शुक्रवार

तिथी:-कार्तिक कृ ११ शके १९४५

 शिवराज शक 350

अयन-दक्षिणायण

ऋतू - शरद ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलावल "



Today's almanac

 Date - 8 December 2023

          Friday

 Tithi-kartik kru 11 shak 1945

 Ayana-Dakshinayana

 Season:-Autumn season


"Jamadilawal"  month of Muslims 


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

शुक्रवार, 08 डिसेंबर 2023

सूर्योदय 07:00, 

खगोलीय दुपार: 12:30, 

सूर्यास्त: 18:01, 

दिवस कालावधी: 11:01, 

रात्र कालावधी: 12:59.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सुविचार

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,

तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.


Good Thought

“Every journey begins with a single step.”

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

दिनविशेष

१९८५: सार्क परिषदेची स्थापना.


आजची म्हण

म्हणी व अर्थ

आधी शिदोरी मग जेजुरी – आधी जेवण केले कि मग देवाचे दर्शन घेणे.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

कोडे

दोन अक्षरांचे माझे नाव

 डोके झाकणे माझे काम

:-टोपी

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

बोधकथा

वडिलांना मदत

भगवान बुद्ध त्या काळात आपल्या शिष्यगणांसह गावोगावी जात होते. एका गावाच्या वेशीवर एक वृद्ध आपल्या मोठ्या टोपलीतून भाजी विकण्यास बसला होता.


ती टोपली जड होती व त्याला तेथून दुसरीकडे जायचे होते म्हणून येणार्‍या - जाणार्‍या वाटसरुंना तो आपल्या डोक्यावर टोपली ठेवण्यास मदत करण्याची याचना करत होता. पण कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. ते शिष्यगणही मजा बघत होते. हे पाहताच भगवान बुद्ध स्वतः पुढे झाले व त्यांनी वृद्धाच्या डोक्यावर टोपली उचलून दिली. त्या वृद्धाने त्यांना ओळखले होते.


तो म्हणाला, सार्‍या जगाच्या दृष्टीने ते कोणीही असोत, पण माझ्या दृष्टीने माझ्या मुलासारखे आहेत ! त्याचे बोलणे ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, हे कसे शक्य आहे ? तो वृद्ध उत्तरला, जगात प्रत्येक मुलगा हा आपल्या मातापित्यांचा आधार असतो. त्यांचे कष्ट उपसण्यास नेहमीच मदत करत असतो.

आज त्यांनीही मला मदत केली आहे. माझे कष्ट हलके केले आहेत. मग ते माझ्या मुलासमानच नाहीत का ? सार्‍या शिष्यांनी त्या वृद्धाचे पाय धरले व क्षमा मागितली.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

श्लोक

जनीं सर्वसूखी असा कोण आहे।

विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥प

मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले।

तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: