डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शालेय परिपाठ दिवस १४१ वा

 *चला सोपा करूया परिपाठ

*दिवस 141 वा*


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

 दिनांक.०२/०१/२०२४ 

भारतीय सौर ११, पौष शके १९४५(हा दिनांक भारतीय सौर दिनदर्शिका जी भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे त्यानुसार आहे.आज पासून ही माहिती देण्यात येईल.

वार:-मंगळवार

अयन-उत्तरायण

ऋतू - हेमंत ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलाखर "

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

Today's almanac

Date 02/01/2024

 Indian Solar 11, Paush Shaka 1945 (This date is according to Indian Solar Calendar which is the official calendar of India. This information will be given from today.

 Day:-Tuesday

 Ayana-Uttarayana

 Ritu - Hemant Ritu

 The holy month of Muslims "Jamadilakhar"


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

मंगळवार, 02 जानेवारी 2024

सूर्योदय 07:07, 

खगोलीय दुपार: 12:38, 

सूर्यास्त: 18:09, 

दिवस कालावधी: 11:02, 

रात्र कालावधी: 12:58.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

*सुविचार* 

उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा


Good Thought

“The way to get started is to quit talking and begin doing.” – Walt Disney. 

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

दिनविशेष

१८८१: लोकमान्य टिळकांनी पुणे येथे मराठा नियतकालिक सुरु केले.

१८८५: पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरु झाले.

१९५४: राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी भारतरत्न पुरस्काराची स्थापना केली.


special day

 1881: Lokmanya Tilak started a Maratha magazine in Pune.

 〉

 1885: Fergusson College started at Pune.


 1954: President Dr.  Rajendra Prasad established the Bharat Ratna Award.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

Proverb/म्हणी

Reap as you sow -पेरावे तसे उगवते


कोडे

मी एक पाहुणा काही दिवसांचा

कधी आशेचा, कधी निराशेचा

नेमाने माझे रूप बदलतो

जाताना नवीन आशा देऊन जातो

तुम्ही मला आनंदाने निरोप देता

दुसऱ्या पाहुण्याचे स्वागतही

तेवढय़ाच जोशात करतात!


:-नवीन वर्ष 


Riddle: What has to be broken before you can use it?

Answer: An egg

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

बोधकथा

गर्विष्ठ गुलाब

  एकदा एक गुलाब होता, त्याला आपल्या सौंदर्यावर खूप गर्व होता. त्याला एकच दुःख होते की तो काटेरी कॅक्टस शेजारी वाढत होता. दररोज गुलाब त्या कॅक्टसचा दिसण्यावरून अपमान करीत असे, पण कॅक्टस शांत असे, बागेतल्या इतर रोपट्यांनी गुलाबाला समजावण्याचा प्रयत्न केला, पण गुलाब स्वतःच्या सौंदर्याबद्दल खूपच जागरूक होता. एकदा उन्हाळ्यात बागेतली झाड़े कोरडी पडली. गुलाब कोमेजू लागला. गुलाबाने पाहिले एक चिमणी तिची चोच पाण्यासाठी कॅक्टस मध्ये डुबवत होती. गुलाबाला खूप लाज वाटली. तरीसुद्धा त्याने कॅक्टस ला विचारले,"मला पण पाणी मिळेल का?" दयाळू कॅक्टस लगेच "हो" म्हणाला आणि त्या दोघांच्या मैत्रीमुळे त्यांनी कडक उन्हाळ्याला तोंड दिले. तात्पर्य: कोणत्याही व्यक्तीविषयी त्याच्या दिसण्यावरून मत बनवू नका.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

Moral story

The proud rose


The Moral


Never judge anyone by the way they look.


Once upon a time, in a desert far away, there was a rose who was so proud of her beautiful looks. Her only complaint was that she was growing next to an ugly cactus.


Every day, the beautiful rose would insult and mock the cactus about his looks, all while the cactus remained quiet. All the other plants nearby tried to make the rose see sense, but she was too swayed by her own looks.


One scorching summer, the desert became dry, and there was no water left for the plants. The rose quickly began to wilt. Her beautiful petals dried up, losing their lush color.


Looking to the cactus, she saw a sparrow dip his beak into the cactus to drink some water. Though ashamed, the rose asked the cactus if she could have some water. The kind cactus readily agreed, helping them both through the tough summer as friends.


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

सामान्य ज्ञान संकलन ज्ञानराज दरेकर

०१) "बलसागर भारत होवो,विश्वात शोभूनी राहो" हे गीत कोणी रचलेले आहे ?

- साने गुरुजी.


०२) ३ जानेवारी,बालिका दिन म्हणून कोणाचा जन्मदिवस साजरा केला जातो ?

- सावित्रीबाई फुले.


०३) स्काऊट गाईड चळवळ कोणी सुरू केली ?

- लॉर्ड बेडन पॉवेल.


०४) ३० जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून कोणाच्या स्मृतिदिनी साजरा केला जातो ?

- महात्मा गांधी.


०५) विजेच्या दिव्यामध्ये कोणता वायू असतो ?

- अरगाॅन.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

General Knowledge Compilation Gnyanraj Darekar

 01) Who has composed the song "Balsagar Bharat Hoo, Vishwaat Shobhuni Raho"?

 - Sane Guruji.


 02) Whose birthday is celebrated as Girl's Day on 3rd January?

 - Savitribai Phule.


 03) Who started Scout Guide movement?

 — Lord Bedon Powell.


 04) January 30th is celebrated as Martyr's Day in whose memory?

 - Mahatma Gandhi.


 05) Which gas is present in electric lamp?

 - Argon.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

श्लोक

अश्वस्य भूषणं वेगो मत्तं स्याद् गजभूषणं।

चातुर्यम् भूषणं नार्या उद्योगो नरभूषणं।।

अर्थ:-घोड्याचे भूषण वेग,हत्तीचे भूषण त्याची चाल आहे.चातुर्य हे स्त्रीचे तर उद्योगशीलता हे पुरुषाचे भूषण आहे.

Meaning in English

For a horse, its swiftness (running speed) is its ornament; for an elephant, its playfulness (majestic gait) is its ornament. And for a woman, her intelligence (skillfulness in various tasks) is her ornament; for a man, his industriousness is his ornament.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: