डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

विद्यार्थ्यांना सुट्टी | students summer vacation|

राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देणेबाबत महत्त्वाचा आदेश....


संदर्भ:- शिक्षण संचालक (प्राथमिक) व शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांचे पत्र क्र.जा.क्र.प्राशिसं/उन्हाळी/२०२४/३१५५. दिनांक १८.०४.२०२४.

उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये आपण राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली असल्यामुळे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देणेबाबतच्या प्रस्तावास मान्यता मिळणेबाबत विनंती केली आहे.


२. वरील नमूद प्रस्तावाच्या अनुषंगाने मला असे कळविण्याचे निर्देश आहेत की, राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देण्यासंदर्भात खालील सुचना देण्यात येत आहेत.


१) राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनांक २२.०४.२०२४ पासून शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देण्यात येत आहे.


२) राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास. विद्यार्थ्यांना उपस्थित राहणेपासून सवलत देण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा.


३) आगामी शैक्षणिक वर्षात शाळा सुरु करण्याबाबत शासन परिपत्रक क्र. संकिर्ण-२०२३/प्र.क्र.१०५/एस.डी.-४. दिनांक २०.०४.२०२३ नुसार कार्यवाही करावी.


३. वरील सूचनांचे पालन होईल याबाबतची दक्षता शिक्षण संचालक (प्राथमिक) व शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी घ्यावी.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: