डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शिक्षक बदली बाबत निवेदन |teachers transfer |

 सार्वत्रिक बदल्यांमध्ये तालुका अंतर्गत बदली प्रक्रिया राबवा...

 शिक्षक समितीची मागणी                                                                                     छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या सार्वत्रिक बदलांची लगीन घाई चालू झाली असून माहिती संकलित करणे याद्या बनवणे अर्ज मागवणे पडताळणी करणे ही कामे सध्या जोरात चालू आहे .

15 जून च्या आत बदल्या होतील असे वाटते परंतु या बदल्यांमध्ये तालुका अंतर्गत बदल्या करणार नाही अशी शिक्षण विभागातून समजते ही बदली प्रक्रिया राबवतांनी शिक्षकांना जर सोयीच्या ठिकाणी पदस्थापना मिळाली नाही तर अध्यापनाचे काम चांगल्या पद्धतीने होत नाही . शिक्षक समाधानी असेल तर अध्यापनाचे काम चांगल्या पद्धतीने चालते बदली हा शिक्षकाचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असून या बदल्यांमध्ये तालुका अंतर्गत बदली प्रक्रिया राबवली नाही तर ज्या शिक्षकांना तालुक्यामध्ये राहायचे परंतु बदली पात्र असल्यामुळे दुसऱ्या शाळेमध्ये बदली करून घ्यायची या प्रक्रियेमुळे त्या शिक्षकाची बदली होणार नाही शिक्षकांना सोयीच्या पदस्थापना मिळणार नाही पर्याय न अध्यापनाचे पवित्र काम समाधानकारक होणार नाही तेव्हा शिक्षक समितीने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजी नगर माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद छत्रपती संभाजी नगर यांना विनंती केली आहे जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया अध्यापन चांगले होण्यासाठी राबवा या असे आशयाचे निवेदन जिल्हाध्यक्ष विजय साळकर नितीन नवले शाम राजपूत शालिग्राम खिस्ते सुनील धाटवळे साळवे केडी मगर अशोक डोळस बबन चव्हाण विलास चव्हाण दीपिका एरंडे मंगला मदने वर्षा देशमुख अर्चना गोरडे जयश्री राठोड प्रीती जाधव आदींनी दिले आहे,
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: