डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

हे वाबळेवाडी मॉडेल आहे…

 हे वाबळेवाडी मॉडेल आहे…


समर्पित शिक्षक, सर्वहितदक्ष पालक व स्वाभिमानी ग्रामस्थ यांच्या परस्पर आंतरक्रियेतून ही दैवी रचना तयार होते. श्री दीपक खैरे व श्री पोपट दरंदले  यांच्यासारखी माणसे शिक्षक म्हणून जन्माला घालण्या पाठीमागे नियतीची खास योजना असू शकते. सध्याच्या काळात शिक्षक कसा असावा याचे वर्णन जर करायला सांगितले तर एकच वाक्यात सांगताना तो *“या दोघांसारखा असावा”* असे मी स्वानुभवातून सांगेन. असे शिक्षक राष्ट्राची संपत्ती असतात.

 स्पर्धा परीक्षेसह सर्वच विषय ज्ञानावर कमालीचे *प्रभुत्व*, त्या ज्ञानाला मुलांकडे हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक असणारे नियोजनासह *कौशल्य* व त्यासाठीचे *सातत्य* या गोष्टी तर त्यांच्याकडे आहेतच, परंतु या व्यतिरिक्त त्यांच्यातील दृढ *सकारात्मकता*… निर्मळ *प्रामाणिकपणा*… समाज व मुलांप्रती निस्सीम *प्रेम व माणुसकीची* भावना… शिक्षक म्हणून असलेल्या जबाबदारीची *जाणीव*… या गोष्टी त्यांच्यात ओतप्रोत भरलेल्या आहेत. 


शिवाय सगळी कर्तव्य पार पाडून झाल्यावर परिणामाचे श्रेय घेण्याची धावपळ नाही… कोणतीही असुरी महत्त्वाकांक्षा नाही… कधीही इतरांप्रती नकारात्मक भावना नाही… कर्तव्याचा कोणताही परतावा अथवा मोबदला यांना नको असतो … आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून हे महात्मे कोणालाही हेवा वाटावा असे अतिशय *सात्विक, शांत व समाधानी जीवन* जगत आहेत जे सध्या विचार व आचाराच्या विसंगतीमुळे बहुतांश शिक्षकांच्याही नशिबी नाही. सात्विक जीवन कसे जगावे हे मी या दोघांकडून शिकलो.


खैरे गुरुजी व दरंदले गुरुजी यांच्या आगमनानंतर खऱ्या अर्थाने आम्ही वाबळेवाडी शाळाविकासाबरोबर उर्जादायी सहजीवनाचे आयुष्यभर स्मरणात ठेवावे असे क्षण अनुभवले व सर्वजण *समृद्ध* झालो. आज सोन्याच्या अंगठ्या नाकारून ते जवळपास दीड लाख रुपये विद्यार्थ्यासाठी interactive panel घेण्यास वापरायला सांगण्याला जे धैर्य लागते ते याच समृद्धतेतून येते…

____________________________

*हितचिंतकांसाठी थोडेसे -* 😊

वाबळेवाडी लोकसहभागाचे मॉडेल समजून घेण्यासाठी रक्तात प्रामाणिकपणा व माणुसकी असावी लागते. उगीच कुणाही स्वार्थी, लबाड, अहंकारी, विध्वंसक व जळक्या मनोवृत्तीच्या *साहेब… बापू… उडाणटप्पू…  व आदींच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या ताई, माई, अक्का आणि त्यांचा कंपू* यांच्यासारख्यांच्या आवाक्यातली ही बाब नाही...


 🖊 दत्तात्रय वारेसर