शिक्षक बदली प्रक्रिया थांबविण्याची या संघटनेने केली मागणी....
कंपनीच्या चुकांमुळे शिक्षकांवर अन्याय, शिक्षक समितीची मुख्यमंत्र्यांकडे दाद
जिल्हा परिषदेच्या बदली प्रक्रियेत अनेक तक्रारी होत असतांना आता तर कंपनीच्या होत असलेल्या चुकांचा फटका बदली पात्र शिक्षकांना खूप मोठया प्रमाणात बसत आहे. बऱ्याच शाळेवर शिक्षक अतिरिक्त होऊन त्यांचा वेतनाचा प्रश्न निर्माण होणार असल्याची शक्यता शिक्षक समितीने वर्तवली असून ही प्रक्रिया थांबवा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
बदली पोर्टलवर दिलेल्या संच मान्यतेनुसार निर्माण होणाऱ्या शिक्षक संख्येपेक्षा अतिरिक्त शिक्षकांना संवर्ग १ च्या बदल्या करताना पदस्थापना देण्यात आली आहे. त्यामुळे त्या शाळेवरील जे शिक्षक बदली पात्र यादीत किंवा अतिरिक्त नसतानाही बदली प्रक्रिया राबवताना विन्सीस कंपनीच्या चुकीमुळे अतिरिक्त ठरले आहेत.
संवर्ग १ मधील शिक्षकांना व मुख्याध्यापकांना ते संवर्ग १ मध्ये पात्र असतानाही त्यांना पर्यायच उपलब्ध न झाल्यामुळे संवर्ग १ मधून फॉर्म भरता आला नाही. पर्याय भरता न आल्यामुळे त्यांना बदली मिळाली नसून संवर्ग १ चा लाभ घेता आला नाही.
१९ जुलैपासून संवर्ग २ म्हणजेच पती पत्नी एकत्रीकरणच्या बदल्या सुरू असतानाही जोडीदारापासून ३० किमी अंतराच्या आतीलच शाळेवर पर्यायाचा नियम असताना संपूर्ण जिल्हाभरातील रिक्त पदे व बदली पात्र पदे निवडसाठी पर्याय म्हणून उपलब्ध करून दिल्यामुळे, संवर्ग २ मधील शिक्षक बदल्या शासन निर्णयानुसार न होताना चुकीच्या होत आहे. त्यामुळे संवर्ग ३ व संवर्ग ४ मधील शिक्षकांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे विन्सी कंपनीकडून बदल्यांचे अधिकार काढून घेण्यात यावे.
तसेच, शिक्षकांच्या बदलीसाठी नव्याने प्रक्रिया राबावावी अशी मागणी शिक्षक समितीने निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे.
आणखी वाचा...